शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

आटपाडीत खासगी स्पर्धा परीक्षांवर बंदी

By admin | Updated: July 10, 2015 23:51 IST

पंचायत समितीचा आदेश : शालेय विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार

अविनाश बाड -आटपाडी -विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खासगी स्पर्धा परीक्षांवर आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यात बंदी घातली आहे. तालुक्यातील कोणत्याही शाळेत खासगी स्पर्धा परीक्षा घेऊ नयेत, असा आदेश विभागाने दिला आहे. त्यामुळे आता पालकांची आर्थिक लूट आणि विद्यार्थ्यांवरील अकारण ताण थांबणार असला तरी, कमिशनला चटावलेल्या गुरुजींचे चेहरे मात्र पडले आहेत.शासनाचा शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषदेची मान्यता नसताना, वेगवेगळ्या खासगी संस्था पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेऊन वेगवेगळ्या खासगी स्पर्धा परीक्षांचे आयोजन काही वर्षांपासून करीत आहेत. एकीकडे शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांची आवड व कल लक्षात घेऊन शिक्षण देणे बंधनकारक असताना, गेल्या काही वर्षांपासून अकारण खासगी स्पर्धा परीक्षांचा सुळसुळाट झाला आहे. काही पालकांनाही अशा परीक्षांमध्ये विद्यार्थ्याने गुण मिळविले की, दुसरी-तिसरीतला मुलगा जिल्हाधिकारी झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. वास्तविक अशा परीक्षांमुळे लहान मुलांच्या बालमनावर परीक्षा आणि पालकांच्या अपेक्षांमुळे अकारण तणाव वाढत आहे. यातून भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. खासगी परीक्षा मात्र दुसरीपासून घेण्याचा पायंडाच पडला होता. खासगी स्पर्धा परीक्षा घेणारे शाळांतून येऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे टक्केवारी देऊन व अन्य आमिषे दाखवून तयार करायचे, मग शिक्षक पालकांना व विद्यार्थ्यांना पटवायचे. ४० रुपये किमतीचे पुस्तक ४०० रुपयांना माथी मारून परीक्षा शुल्काच्या नावाखाली पालकांची लूट सुरू होती. वार्षिक अभ्यासक्रम संपविणे हेच जरूरीचे आणि बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे जिकिरीचे बनलेले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना कोठेही खासगी स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देत नव्हते. टक्केवारी घेतल्यानंतर वर्षातून एकदा एका ठिकाणी परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि निकालाबद्दलही शंका उपस्थित होत होत्या. मुले अशा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत, पण शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मात्र ही मुले कोठेच दिसत नव्हती.कोणत्याही शाळेकडे अथवा शिक्षकाकडे कोणताही व्यापार करण्याचा परवाना नसतो. त्यामुळे शासकीय परीक्षांशिवाय इतर कोणत्याही खासगी स्पर्धा परीक्षा घेणे, त्यासाठी पुस्तके विकत घेणे, ती विद्यार्थ्यांना विकत देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सर्व केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन, कोणत्याही शाळेत खासगी स्पर्धा परीक्षा घेऊ नयेत, अशी सक्त सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी स्वत: प्रश्नपत्रिका काढून चाचणी परीक्षा घ्याव्यात.- आर. आर. आटुगडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आटपाडी गुरुजी तुम्हीसुध्दा?सध्या अनेक गुरुजी वेगवेगळ्या साखळी योजनांतून पत्नीच्या नावे ‘एजंट’ होऊन पैसा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुतांशी शिक्षक आमिषापोटी भुलत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे शाळा बंद पडत असताना, आटपाडी शिक्षण विभागाने तालुक्यात खासगी स्पर्धा परीक्षांना पायबंद घालून नवा आदर्श निर्माण केला आहे.