शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ नवे रुग्ण; १९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी काहीशी घट होत नवे ९८४ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १७ अशा १९ ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी काहीशी घट होत नवे ९८४ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १७ अशा १९ जणांचा मृत्यू झाला, तर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत ११२० जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचे तीन नवे रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, मिरज ४, कडेगाव ३, खानापूर, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात प्रत्येकी २, पलूस, शिराळा आणि मिरज तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

चाचण्यांचे प्रमाण वाढविताना आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआर अंतर्गत ४०७४ जणांच्या नमुने तपासणीतून २७७ जण पॉझिटिव्ह आढळले. रॅपिड अँटिजनच्या ९४७२ जणांच्या नमुने तपासणीतून ७२४ जण बाधित आढळले.

उपचार घेत असलेल्या ९७१३ रुग्णांपैकी ९८६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८३४ जण ऑक्सिजनवर, तर १५२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर नवे १७ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट -

म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली. दिवसभरात तीन नवे रुग्ण आढळून येतानाच दोघांचा मृत्यू झाला.

चाैकट -

आतापर्यंतचे एकूण बाधित १५४७८२

उपचार घेत असलेले ९७१३

कोरोनामुक्त झालेले १४०८३८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४२३१

पॉझिटिव्हिटी रेट ६.८०

शुक्रवारी दिवसभरात

सांगली १८६

मिरज ३४

आटपाडी ३८

कडेगाव ४९

खानापूर ७८

पलूस ५७

तासगाव ६५

जत ६१

कवठेमहांकाळ ५६

मिरज तालुका ११२

शिराळा ४८

वाळवा २००