सांगली : जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाचे नवे ९७९ रुग्ण आढळले तर ३३ जणांचा मृत्यू झाला असून, १२६३ जणांनी कोरोनावर मात केली. म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. रविवारी जिल्ह्यात ४६० तर सोमवारी ५१९ असे ९७९ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील २८ नवे रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत. दोन दिवसात आटपाडी तालुक्यात ८०, कडेगाव १४३, जत ६१, कवठेमहांकाळ ८३, खानापूर ८७, मिरज १२९, पलूस २०, शिराळा १४, तासगाव १३२, वाळवा १०९ तर महापालिका क्षेत्रातील सांगलीत ९४ व मिरजेत २७ रुग्ण सापडले.
दोन दिवसात जिल्ह्यातील ३३ जणांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी ३, कडेगाव, जत, खानापूर तालुक्यातील प्रत्येकी १, कवठेमहांकाळ, मिरज प्रत्येकी चार, पलूस २, वाळवा व तासगाव तालुक्यातील ५ तर महापालिका क्षेत्रातील ७ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ७४० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर ५ हजार ६०० रुग्ण उपचाराखाली आहेत.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,८५,५८०
कोरोनामुक्त झालेले : १,७५,०९९
आतापर्यंतचे मृत्यू : ४,८८१
चौकट
रविवारी व सोमवारी दिवसभरात...
सांगली : ९४
मिरज : २७
आटपाडी : ८०
जत : ६१
कडेगाव : १४३
कवठेमहांकाळ : ८३
खानापूर : ८७
मिरज : १२९
पलूस : २०
शिराळा : १४
तासगाव : १३२
वाळवा : १०९