सांगली : शहरातील धामणी रोडवर असलेल्या हनुमाननगर परिसरात शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी रोख २५ हजारांसह ९७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी संतोष दयाराम काळेल (रा. स्वप्न निवास, हनुमाननगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष काळेल हे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत बाहेरगावी गेले होते. या कालावधीत घरात काेणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील रोख २५ हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
परगावहून आल्यानंतर काळेल यांच्या हा प्रकार लक्षात आला. विश्रामबाग पाेलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यासह श्नानपथकानेही माग काढण्याचा प्रयत्न केला.