शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीअभावी ९४% उमेदवार तणावग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:08 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वर्षभरापासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीचे दुष्परिणाम डी. एड्., बी. एड्.धारक ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वर्षभरापासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीचे दुष्परिणाम डी. एड्., बी. एड्.धारक उमेदवारांच्या मानसिक अवस्थेवर होऊ लागले आहेत. भरती प्रक्रिया लांबल्याने नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढला आहे, अशी भावना ९४ टक्के उमेदवारांनी यासंदर्भातील सोशल मीडियावरील सर्वेक्षणात मांडली आहे.आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती प्रक्रियेस अखेर शासनाने सुरुवात केली. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षक म्हणून नोकरी करण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रथम टीईटी त्यानंतर अभियोग्यता चाचणी असे टप्पे ठेवूनही तरुणांनी परिश्रम घेत दोन्ही परीक्षेत आपली गुणवत्ता सिध्द केली होती. केवळ दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही लटकलेलीच आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण, त्यानंतर बिंदूनामावली अद्ययावत करण्यासाठी वाढविलेली मुदतवाढ आणि त्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १० टक्के आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच राज्यातील अनेक जिल्हा परिषदेने अजूनही बिंदूनामावली अद्ययावत केली नसल्याने शिक्षक भरती नक्की कधी होणार? हे कोणीही सांगू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीकडे टक लावून बसलेल्या डी. एड्., बी. एड्.धारकांचा वारंवार अपेक्षाभंग होत आहे. २८ हजार, २४ हजार आणि त्यानंतर १८ हजार अशी शिक्षकांच्या भरतीची संख्या कमीच होत असल्याने तरुणांत अस्वस्थता वाढत आहे. याचा राग सोशल मीडियावरून उमेदवार व्यक्त करत आहेत. भरतीसाठी राज्यातून १ लाख ९७ हजार ५२0 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील १ लाख २१ हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. आता यापैकी १५ टक्के उमेदवारांनाच नोकरीचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.यासाठी पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने गेल्या आठवड्यात फेसबुक, ट्विटर, वॉटस् अ‍ॅप, टेलिग्राम अशा विविध सोशल मीडियावर एक सर्व्हे घेण्यात आला. या सर्व्हेत ३९९ ते ६०० पर्यंत विद्यार्थ्यांनी भाग घेत आपले मत नोंदविले. त्यानुसार शिक्षक भरती लांबल्याने तरुणांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे का? या प्रश्नावर ९४ टक्के तरुणांनी होय म्हणून उत्तर दिले, तर ३ टक्के तरुणांनी नाही असे सांगितले. ३ टक्के तरुणांनी काहीही सांगता येत नाही, असे सांगितले आहे.मानसशास्त्र अभ्यासकांशीही : चर्चासंघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासकांशी चर्चा केली असता, तरुणांमधील नकारात्मक मानसिकता चिंताजनक असल्याचे सांगितले. तरुण मोठ्या आतुरतेने प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहेत. नवीन सकारात्मक काही तरी माहिती मिळेल म्हणून सोशल मीडियावर सतत येऊनही तरुणांचा अपेक्षाभंगच होत आहे. त्यामुळे तरुणांनी मानसिक तणावाखाली राहू नये, असे तज्ज्ञांनी सांगितले.