शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

९८ जागांसाठी ११ हजार अर्ज दाखल...

By admin | Updated: November 17, 2015 00:04 IST

जिल्हा परिषद : ग्रामसेवकाच्या ३६ जागांसाठी तब्बल साडेपाच हजार अर्ज

सांगली : जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या ९८ जागांसाठी तब्बल ११ हजार ३३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे ५ हजार पाचशे एक अर्ज कंत्राटी ग्रामसेवकाच्या ३६ जागांसाठी प्राप्त झाले आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नेट कॅफेत उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या विविध पदांसाठीची परीक्षा २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरअखेर होणार आहे. जिल्हा परिषदेतील १३ विविध विभागांतील ९८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पद, रिक्त जागा व प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे : कनिष्ठ अभियंता : एक जागा, १७ अर्ज. पशुसंवर्धन पर्यवेक्षक : एक जागा, ४९ अर्ज. कनिष्ठ सहायक (लिपिक) : दोन जागा, ३९३ अर्ज. कनिष्ठ सहायक (लेखा) : एक जागा, ३४५ अर्ज. अंगणवाडी पर्यवेक्षिका : दोन जागा, १३५ अर्ज. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) : एक जागा, १३०५ अर्ज. कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) : दोन जागा, १०८ अर्ज. विस्तार अधिकारी (शिक्षण) : एक जागा, २८० अर्ज. औषध निर्माण अधिकारी : तीन जागा, ५८४ अर्ज. आरोग्य सेवक (पुरुष) : आठ जागा, ६२३ अर्ज. आरोग्य सेवक (महिला) : ३८ जागा, ११४९ अर्ज. कंत्राटी ग्रामसेवक : ३६ जागा, ५५०१ अर्ज. स्थापत्य अधिकारी (सहायक) : दोन जागा, ५४४ अर्ज.९८ रिक्त जागांसाठी दाखल ११ हजार ३३ अर्जात १३७ माजी सैनिकांनीही विविध पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदाबरोबरच आरोग्य सेवक महिला, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), औषध निर्माण अधिकारी आदी पदांसाठी कमी रिक्त जागा असतानाही मोठ्या संख्येने तरुणांनी अर्ज भरले आहेत. २५ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत या पदांसाठी परीक्षा होणार आहेत. (प्रतिनिधी)