शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भोसरेतील सहा बंधाऱ्यांसाठी ८६ लाख

By admin | Updated: May 11, 2017 23:08 IST

भोसरेतील सहा बंधाऱ्यांसाठी ८६ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘जलयुक्त शिवार योजना ही योजना राहिली नसून एक चळवळ बनली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी भोसरे येथे सहा बंधारे बांधण्यासाठी ८६ लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील,’ असे आश्वासन सहपालक व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खटाव तालुक्यातील भोसरे येथे श्रमदानातून सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या ठिकाणच्या कामाला गुरुवारी सकाळी भेट दिली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थ, शेतकरी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये मनमोकळेपणे चर्चा करून श्रमदान केले. तसेच भोसरेतील ६ बंधाऱ्यांच्या कामासाठी ८६ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. शिवार फेरी काढून श्रमदान करणाऱ्या प्रत्येकाशी हितगूज साधले. विविध कामांची माहिती घेतली व ग्रामस्थांच्या एकजुटीबद्दल समाधानही व्यक्त केले.भोसरे गावच्या दक्षिणेस सुरू असलेल्या माती बांध, समतल चर काढणे, बंधारे, लूज बोल्डरच्या कामाची मंत्री खोत यांनी पाहणी केली. यावेळी कॉलेज युवक, युवतींनी आपले मनोगत व्यक्त केले. मंत्री खोत यांनी उपस्थित विद्यार्थी, अधिकारी, ग्रामस्थांना दुष्काळाची व्यथा सांगणाऱ्या कविताही ऐकविल्या.मागील एक महिन्यापासून या ठिकाणी सुमारे एक हजार नागरिक, महिला सकाळी व सायंकाळी सुमारे सात ते आठ तास श्रमदान करीत आहेत. यामाध्यमातून वॉटर कप स्पर्धेचे पारितोषिक मिळविण्याचा चंग भोसरेवासीयांनी बांधला आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाणार आहे. जिरविले जाणार आहे, याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यावेळी पाहायला मिळत होता.यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अनिल देसाई, सागर खोत, संजय भगत, कृषी अधिकारी भुजबळ, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार प्रियांका पवार-कर्डिले, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी अनिल महामुलकर, राजीव देशमुख, विजय वसव, पाटणे, विजय काळे व अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाडाखाली बसून पिठलं-भाकरीचा आस्वाद...मंत्री खोत यांनी एका शिवारात झाडाखाली बसून दही-ठेचा, पिठलं-भाकरी खाण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हाताने कांदा फोडून जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व भाजपचे कार्यकर्तेही जेवण करण्यास बसले होते.