शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

ग्रामपंचायतींसाठी ८३% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने आणि ईर्षेने सुमारे ८३.३२ टक्के मतदान झाले. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी १०,०५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कडेगाव, वाळवा, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीआणि वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित तालुक्यांत शांततेत मतदान झाले. मतमोजणी आज (मंगळवारी) ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने आणि ईर्षेने सुमारे ८३.३२ टक्के मतदान झाले. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी १०,०५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कडेगाव, वाळवा, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीआणि वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित तालुक्यांत शांततेत मतदान झाले. मतमोजणी आज (मंगळवारी) तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे. दुपारी चारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत.जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींपैकी २९ बिनविरोध झाल्यामुळे ४२४ गावांमध्ये सरपंचपदासाठी ११४१ उमेदवार रिंगणात उतरले होते. ग्रामपंचायत सदस्यांच्या १६३० जागांपैकी ३८९ सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे १२४१ जागांसाठी ८९८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. दुपारनंतर मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगाच्या-रांगा लागल्या होत्या. उमेदवारांनी बाहेरगावच्या मतदारांसाठी मोटारी, खासगी बसेसची सोय केली होती. जिल्ह्यात ११.३० पर्यंत ३६.३५ टक्के, तर दुपारी दीडपर्यंत ५७.९३ टक्के आणि साडेतीनपर्यंत ७२.९७ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाचला वेळ संपताना ८३.३२ टक्के मतदान झाले होते. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ८६.९८ टक्के, तर सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७९.१७ टक्के मतदान झाले. जत तालुक्यातील संख येथे रात्री ८.४९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. येथे पावसामुळे मतदानासाठी अडथळा आल्यामुळे मतदारांना केंद्रावर येण्यास उशीर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला असतानाही तासगाव तालुक्यातील चिंचणी, मणेराजुरी, आरवडे, वाळवा तालुक्यातील वाटेगाव, चिंचणी, ऐतवडे खुर्द येथे मारामारी झाली. मणेराजुरी, आरवडे, वाटेगाव येथे तणावाचे वातावरण होते. खानापूर तालुक्यातील लेंगरे, भाळवणी, आळसंद, कमळापूर, गार्डी येथे बाचाबाची झाली. कमळापूर येथे बोगस मतदान करण्यासाठी येणाºया दोन गाड्या पोलिसांनी पकडल्या. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रेत किरकोळ बाचाबाचीचा प्रकार घडला. तेथे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. संवेदनशील मतदान केंद्रांवर तणावाचे वातावरण होते. पण बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याने कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. वाळवा तालुक्यातील मर्दवाडी, तासगाव तालक्यातील आरवाडे, पलूस तालुक्यातील सांगडेवाडीसह अनेक गावांत मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. मात्र ती तातडीने दुरुस्त करण्यात आली.जिल्ह्यात झालेले मतदान...तालुका टक्केवारीजत ८०क.महांकाळ ८६शिराळा ८६.९८वाळवा ८१.७३पलूस ८५.७३कडेगाव ८२.९६तासगाव ८४.२६मिरज ८५खानापूर ७९.१७आटपाडी ८१.७२एकूण ८३.३२