शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नगराध्यक्ष’साठी तासगावात ८ अर्ज

By admin | Updated: July 12, 2014 00:19 IST

बुधवारी निवड : चार उमेदवारांचे प्रत्येकी दोन अर्ज

तासगाव : तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत आज (शुक्रवार) एकूण चार उमेदवारांचे आठ अर्ज दाखल करण्यात आले. छाननी प्रक्रियेत एकही अर्ज फेटाळला गेला नाही. नगराध्यक्ष निवडीची विशेष सभा बुधवार दि. १६ रोजी पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी, मिरज यांनी नुकताच जाहीर केला होता. त्यानुसार आज अर्ज दाखल करण्याच्या दिवशी गृहमंत्री आर. आर. पाटील गटाकडून शुभांगी साळुंखे, खा. संजयकाका पाटील गटाकडून बाबासाहेब पाटील व अविनाश पाटील, तर कॉँग्रेसकडून संजय पवार या उमेदवारांचे प्रत्येकी दोन असे आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.दि. १४ रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार असून दि. १६ रोजी नगराध्यक्ष निवड होणार आहे. त्याचदिवशी सकाळी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार असून तीही निवड नगराध्यक्ष निवडीनंतर होणार आहे. आज पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी काम पाहिले.निवडीच्या पार्श्वभूमीवर आठवड्याभरापासून शहरातील राजकारण तापले आहे. नगराध्यक्ष कुठल्या गटाचा होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. नगराध्यक्ष आपलाच झाला पाहिजे यासाठी मंत्री गट व खासदार गटाने जोरदार प्रयत्नही केलेले आहेत. त्यात पालिकेतील कॉँग्रेसचे एकमेव सदस्य संजय पवार यांनीही अर्ज दाखल करून या निवडणुकीतली रंगत वाढवली आहे.दोन दिवसांपासून मंत्री गटात व खासदार गटातील बैठकांनी वेग घेतला होता. आज सकाळीही दोन्ही गटांच्या बैठका झाल्या. गटात कुणी अर्ज भरायचे, यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार पालिकेत येऊन सदस्यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यापूर्वी पालिकेत कोण-कोण येते, कसे राजकारण होते, याकडे नजरा लागून राहिल्या होत्या. आज दिवसभर या निवडीबाबतची चर्चा शहरभर सुरू होती. आता सोमवारी अर्ज कोण मागे घेणार व अंतिमत: मैदानात कोण राहणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)