शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 चोवीस लाख बोटांसाठी ७६ लिटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:23 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एरवी ‘डाग’ कोणालाच आवडत नाहीत. मात्र, मतदानानंतर बोटावरील शाईचा ‘डाग’ दाखविण्याचा ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एरवी ‘डाग’ कोणालाच आवडत नाहीत. मात्र, मतदानानंतर बोटावरील शाईचा ‘डाग’ दाखविण्याचा आनंद काही औरच असतो. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईच्या ३ लाख बाटल्या राज्यात आणण्यात आल्या आहेत. त्यातील ७५५२ बाटल्या सांगली व हातकणंगले मतदारसंघासाठी पाठविण्यात आल्या आहेत. दोन्ही मतदारसंघातील २३ लाख ६३ हजार १२८ मतदारांच्या तर्जनीवर एकूण ७६ लिटर शाईचा वापर करण्यात येणार आहे.मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले असून ते तालुकापातळीवर पाठविण्यातही आले आहे. या असंख्य साहित्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई. मतदान केल्यानंतर मतदाराच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. सांगली मतदारसंघ व हातकणंगले मतदारसंघातील शिराळा व इस्लामपूर मतदारसंघासाठी साहित्य देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात साहित्य पुरवठा करण्यात आला आहे.प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीमध्ये १० मि.लि. निळी शाई असते. या एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या तर्जनीवर निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र, २००६ पासून निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिल्याने शाई जास्त लागत आहे. त्यादृष्टीने जादा शाईचा पुरवठा करण्यात आला आहे.कोणत्या बोटावर लागते शाईमतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली नसेल, तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.म्हैसूरची शाईसंपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी या शाईची ख्याती आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक