शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील काँग्रेसचे ७० टक्के उमेदवार निश्चित

By admin | Updated: February 4, 2017 00:12 IST

जिल्हा परिषद : जयश्रीताई, प्रतीक, विशाल पाटील यांच्या बैठकीत निर्णय; आज पुन्हा सांगलीत बैठक

सांगली : मिरज तालुक्यातील ११ जिल्हा परिषद गट आणि २२ पंचायत समिती गणांपैकी काँग्रेसच्या ७० टक्के उमेदवारांची नावे माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई मदन पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३) निश्चित केली आहेत. उर्वरित नावे निश्चित करण्यासाठी शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे.सांगलीतील जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर शुक्रवारी काँग्रेसच्या वसंतदादा-मदनभाऊ गटांची बैठक झाली. या बैठकीस प्रतीक पाटील, विशाल पाटील, संग्राम पाटील, सोनीचे दिनकर पाटील यांच्यासह मिरज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटातून सरपंच विशाल श्रीपाल चौगुले यांच्या नावावर सर्वच नेत्यांचे एकमत झाले. कवठेपिरान पंचायत समिती गणातून अनिल आमटवणे यांचेही नाव निश्चित झाले. समडोळी पंचायत समिती गण खुला असल्यामुळे येथून इच्छुकांची संख्या जास्त आहे. संजय सावंत आणि अशोक मोहिते यांच्या नावावर चर्चा झाली. सावंत यांना उमेदवारी देण्यास प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी सहमती दर्शविली आहे. एरंडोली जिल्हा परिषद गटात जयश्री तानाजी पाटील आणि संगीता खुळे-पाटील यांच्यामध्ये उमेदवारी मिळविण्यावरून स्पर्धा आहे. यातील एक गट नाराज होणार असल्याने नेत्यांनी येथील उमेदवारी जाहीर करण्याचे टाळून, शनिवारी निर्णय घेण्याचे ठरले. भोसे जिल्हा परिषद गटातून माजी सरपंच शीतल पाटील यांची पत्नी मीनाक्षी पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. सोनी पंचायत समिती गणातून दिनकर पाटील समर्थक रंगराव जाधव यांच्या उमेदवारीलाही हिरवा कंदील दाखवण्यात आला. एरंडोली, भोसे, नांद्रे, सोनी, सलगरे, कवठेपिरान, समडोळी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या नऊ जागा जयश्रीताई पाटील यांच्या म्हणजे मदनभाऊ गटाला दिल्या आहेत. उर्वरित सर्व जागांचे निर्णय प्रतीक पाटील आणि विशाल पाटील घेणार आहेत. त्यांचेही उमेदवार निश्चित आहेत. पण, बंडखोरी टाळण्यासाठी नावे गोपनीय ठेवली आहेत. काही नावांवर जयश्रीताई आणि प्रतीक पाटील यांचे एकमत झालेले नाही. उर्वरित जागांसाठी शनिवारी पुन्हा प्रतीक पाटील, जयश्रीताई आणि विशाल पाटील यांची बैठक होणार आहे. त्यात नावे निश्चित करण्यात येणार आहेत. विशाल पाटील कोण, हे दाखवून देऊ.. सांगली : मिरज तालुक्यातील ११ जिल्हा परिषद गट आणि २२ पंचायत समिती गणांपैकी काँग्रेसच्या ७० टक्के उमेदवारांची नावे माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई मदन पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३) निश्चित केली आहेत. उर्वरित नावे निश्चित करण्यासाठी शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे.सांगलीतील जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर शुक्रवारी काँग्रेसच्या वसंतदादा-मदनभाऊ गटांची बैठक झाली. या बैठकीस प्रतीक पाटील, विशाल पाटील, संग्राम पाटील, सोनीचे दिनकर पाटील यांच्यासह मिरज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटातून सरपंच विशाल श्रीपाल चौगुले यांच्या नावावर सर्वच नेत्यांचे एकमत झाले. कवठेपिरान पंचायत समिती गणातून अनिल आमटवणे यांचेही नाव निश्चित झाले. समडोळी पंचायत समिती गण खुला असल्यामुळे येथून इच्छुकांची संख्या जास्त आहे. संजय सावंत आणि अशोक मोहिते यांच्या नावावर चर्चा झाली. सावंत यांना उमेदवारी देण्यास प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी सहमती दर्शविली आहे. एरंडोली जिल्हा परिषद गटात जयश्री तानाजी पाटील आणि संगीता खुळे-पाटील यांच्यामध्ये उमेदवारी मिळविण्यावरून स्पर्धा आहे. यातील एक गट नाराज होणार असल्याने नेत्यांनी येथील उमेदवारी जाहीर करण्याचे टाळून, शनिवारी निर्णय घेण्याचे ठरले. भोसे जिल्हा परिषद गटातून माजी सरपंच शीतल पाटील यांची पत्नी मीनाक्षी पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. सोनी पंचायत समिती गणातून दिनकर पाटील समर्थक रंगराव जाधव यांच्या उमेदवारीलाही हिरवा कंदील दाखवण्यात आला. एरंडोली, भोसे, नांद्रे, सोनी, सलगरे, कवठेपिरान, समडोळी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या नऊ जागा जयश्रीताई पाटील यांच्या म्हणजे मदनभाऊ गटाला दिल्या आहेत. उर्वरित सर्व जागांचे निर्णय प्रतीक पाटील आणि विशाल पाटील घेणार आहेत. त्यांचेही उमेदवार निश्चित आहेत. पण, बंडखोरी टाळण्यासाठी नावे गोपनीय ठेवली आहेत. काही नावांवर जयश्रीताई आणि प्रतीक पाटील यांचे एकमत झालेले नाही. उर्वरित जागांसाठी शनिवारी पुन्हा प्रतीक पाटील, जयश्रीताई आणि विशाल पाटील यांची बैठक होणार आहे. त्यात नावे निश्चित करण्यात येणार आहेत.