शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जिल्ह्यात ६९%मतदान

By admin | Updated: February 21, 2017 23:22 IST

८२४ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद : उन्हाच्या झळा सोसतच मतदारांनी बजावला हक्क

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी सातारा जिल्ह्यात सरासरी ६८.६६ टक्के मतदान झाले. १९ लाख ६६ हजार १३ पैकी १३ लाख ४९ हजार ८८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मशीन बदलाव्या लागल्या. तुरळक आक्षेपाच्या घटना वगळता मतदान शांततेच्या वातावरणात पार पडले. जिल्हा परिषदेच्या ६४ व पंचायत समितीच्या १२८ अशा एकूण १९२ जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीनपर्यंत खंडाळ्यात ६१.४४ टक्के व कऱ्हाड तालुक्यात ६१.७७ टक्के मतदान झाले होते. या दोन तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असून खंडाळा तालुक्यात ७५.३८, तर कऱ्हाड तालुक्यात ६३.२१ टक्के इतके मतदान झाले. खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे मतदानासाठी आलेल्या ठकुबाई एकनाथ नेवसे (वय ८३) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मतदान केंद्रावर आल्या असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना नायगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिरजे, ता. खंडाळा येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. महाबळेश्वर शहरात मंगळवारी आठवडी बाजार होता. निवडणुकीतील मतदान प्रक्रिया मंगळवारीच असल्याने प्रशासनाने ऐनवेळी आठवडी बाजार रद्द केल्याचा निर्णय घेतल्याने खरेदीसाठी आलेले लोक व विक्रेते यांची चांगलीच धांदल उडाली. नागठाणे, ता. सातारा येथील मतदान केंद्रावर कुठल्याही उमेदवाराला मतदान केले तरी ते भाजपच्या उमेदवारालाच मिळत असल्याची तक्रार तेथील इतर पक्षांच्या उमेदवारांनी केली. याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे भोसले घटनास्थळी हजर झाले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदान केंद्राला भेट दिली. या मशीनमध्ये त्रुटी असल्याने ती बदलण्याची सूचना आमदारांनी केंद्राध्यक्षांना केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांच्या सूचनेनंतर ही मशीन बदलण्यात आली. २ हजार ५८४ मतदान केंद्रांवर १६ हजार ९८२ निवडणूक कर्मचारी कार्यरत होते. ५ हजार ८९४ पोलिस अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून होते. ठळक घटनानागठाणे, ता. सातारा केंद्रावर कुठल्याही उमेदवाराला मतदानकेले तरी एकाच उमेदवाराला मिळत असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर मशीन बदलण्यात आलीसातारा तालुक्यात एकूण तीन मशीन बदलल्याच्शाहूपुरी, ता. सातारा येथे प्रशासनाने ऐनवेळी मतदार याद्या पुरविल्यामिरजे, ता. खंडाळा येथेउशिरापर्यंत मतदानतरडगावला अनेकजण मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित