शिराळा : तालुक्यात शनिवारी २९ गावामध्ये ६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या कमी होत असल्याने माेठा दिलासा मिळाला आहे. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे, बिऊर, पाडळी ही गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. शनिवारी मांगले येथे ११, वाकुर्डे खुर्द येथे ७, शिराळा, जांभळेवाडी, खूजगाव, कोकरुड येथे प्रत्येकी ४, रिळे, बिऊर, शेटकेवाडी, टाकवे येथे प्रत्येकी ३ यासह २९ गावात ६९ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या ७३३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यापैकी ६५३ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सहा रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून, उपजिल्हा रुग्णालयात ४३, कोकरुड ग्रामीण रुग्णालय २४, स्वस्तिक कोविड सेंटर येथे ३, तर खासगी रुग्णालयात ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शिराळा तालुक्यात ६९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST