शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

शहरात ६५ धोकादायक इमारती

By admin | Updated: June 14, 2016 00:21 IST

कारवाई शून्य : महापालिकेकडून नोटिसीचे कागदी घोडे नाचविण्याचे काम

शीतल पाटील---सांगली -महापालिका क्षेत्रात ६५ हून अधिक धोकादायक इमारती आहेत, ज्या पावसाळ्यापूर्वी पाडणे आवश्यक आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागाने या धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला की महापालिकेकडून नोटिसांचे कागदी घोडे नाचविले जातात. प्रत्यक्षात कारवाई मात्र शून्य असते. दोन दिवसांपूर्वी स्टेशन चौकातील एक इमारत कोसळली. त्यात कोणीच रहिवासी नसल्याने जीवित हानी झाली नाही. पण हीच दुर्घटना रहिवासी क्षेत्रात घडली तर काय? पण याची फिकीर महापालिका प्रशासनाला दिसत नाही. पावसाळा तोंडावर आला की दरवर्षी धोकादायक इमारतींचा विषय चर्चेच्या पटलावर येतो. आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांकडून धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला जातो. अशा इमारतींची यादी तयार होते. इमारत मालकांना महापालिका कारणे दाखवा नोटिसा बजावते. प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही. सांगली शहरात धोकादायक इमारतींची संख्या १७ हून अधिक आहे, तर मिरज शहरात सर्वात जास्त धोकादायक इमारती आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या इमारतींना धोकादायक म्हणून घोषित केले जाते. ही प्रक्रिया दरवर्षी राबविली जाते. पण त्यातून कारवाईचे प्रमाण मात्र शून्यच राहिले आहे. गेल्या तीन ते चार वर्षात महापालिकेने केवळ पाच ते सहा इमारती पाडल्या आहेत. यावरूनच कारवाईची तीव्रता व प्रशासनाच्या गांभीर्याची कल्पना येते. सोमवारी रात्री स्टेशन चौकातील हॉटेल विहारच्या पाठीमागील बाजूस असणारी एक धोकादायक इमारत कोसळली. या इमारतीत सध्या कोणीच राहत नव्हते. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. मात्र अशी घटना कधीही घडू शकते. यादृष्टीने महापालिका प्रशासन किती गंभीर आहे?, असा प्रश्न उपस्थित होतो. धोकादायक इमारत ठरवून ती पाडण्यातही प्रशासनाचा स्वार्थ असतो. नगरसेवक, पदाधिकारी, राजकीय नेत्यांच्या स्वार्थापोटी धोकादायक इमारती पाडल्या जातात. त्या इमारतीत कुळ असेल तर मात्र मोठा वाद होतो. त्याचा अनुभव माळी गल्लीतील इमारत पाडण्याच्या कारवाईवेळी प्रशासनाला आला. महापालिकेने एका धोकादायक घराची एक भिंत पाडली, तर मूळ मालकाने संपूर्ण घर पाडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मोठा वाद झाला होता. असे प्रकार वारंवार घडत असतात. महापालिकेकडे धोकादायक इमारतींची व्याख्याही अद्याप स्पष्ट नाही. पावसाळ्यात कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी अशा धोकादायक इमारती घरमालकांनी स्वत:हून पाडून घ्यायच्या असतात. यासाठी सुरुवातीला महापालिका नोटिसा बजावते. यंदा ६५ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. या इमारतमालकांनी स्वत:हून उतरवून घ्यायच्या आहेत. पण या इमारती पाडायला गेले तर कुठे कुळाचा वाद समोर येतो, तर कुठे भाडेकरूंचा प्रश्न असतो. अशा इमारतीबाबत मूळ मालक मात्र धोकादायक इमारत पाडण्यासाठी आग्रही असतो. पण त्यात काही न्यायप्रविष्ट बाब असेल, तर महापालिकेची कोंडी होते. पण त्यावर अद्याप प्रशासनाला पर्याय सापडलेला नाही. महापालिकेची : इमारत धोकादायकमहापालिकेच्या मुख्यालयासमोरील अतिथीगृहाचीच इमारत धोकादायक बनली आहे. पालिकेने या इमारतीवर तसा फलकही लावला आहे. या जागेवर बीओटीतून व्यापारी संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडीटही करण्यात आले. पालिकेच्या पॅनेलवरील आर्किटेक्टनेही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. तरीही ही इमारत उतरवून घेतली गेलेली नाही. यावरून पालिकेचे प्रशासन धोकादायक इमारतीबाबत किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येतो.प्रशासनाची कोंडीशहरातील धोकादायक इमारत पाडायला गेले, तर यातील कुळे आडवी येतात. घरमालकालाच आपली धोकादायक इमारत पाडून भाडेकरुला घालवायचे असते. यामुळे बहुतेक मालक स्वत:हून महापालिकेला पत्र देऊन धोकादायक इमारत पाडा, असे सांगतात. इमारत पाडायला जेव्हा महापालिका जाते, तेव्हा भाडेकरू न्यायालयात गेलेला असतो. भाडेकरू व मालकाच्या वादात महापालिकेला प्रतिवादी केलेले नसते. जेव्हा इमारत पाडण्यासाठी पथक जाते, तेव्हा न्यायालयीन बाबी समोर येतात. मग महापालिकेला हात हलवत मागे फिरावे लागते.