शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगलीत ६00 बेशिस्त वाहनधारकांना ह्यई-चलनह्णचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 13:02 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहर परिसरातील सातशे बेशिस्त वाहनधारकांना ई-चलनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा घरी पाठविण्यात आल्या आहेत. ई-चलन प्रणालीमुळे वादावादीला पूर्णविराम मिळाला आहे. वाहतूक नियम तोडूनही दंड भरण्यास नकार देणाºयांना ही नोटीस भारी पडत आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची नोटीस थेट घरी मिळत असल्याने वाहनधारक दंड भरण्यास स्वत: वाहतूक शाखेत हजेरी लावत आहेत.

ठळक मुद्देनोटिसा घरपोच : खटल्याच्या धास्तीने वाहनधारक नमलेदीड लाख रुपयांचा दंड वसूलकारवाईची तीव्रता वाढणार...सीसीटीव्ही, सिग्नल बसणार!

सचिन लाड 

सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहर परिसरातील सातशे बेशिस्त वाहनधारकांना ई-चलनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा घरी पाठविण्यात आल्या आहेत. ई-चलन प्रणालीमुळे वादावादीला पूर्णविराम मिळाला आहे. वाहतूक नियम तोडूनही दंड भरण्यास नकार देणाºयांना ही नोटीस भारी पडत आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची नोटीस थेटघरी मिळत असल्याने वाहनधारक दंड भरण्यास स्वत: वाहतूक शाखेत हजेरी लावत आहेत.

ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, सीटबेल्ट न घालणे, नियमबाह्य नंबर प्लेट, कर्कश हॉर्न, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, लायसन्स नसणे,हेल्मेट न घालणे यासह इतर वाहतूक नियम वाहनधारकांकडून मोडले जातात. वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर दंड भरण्यास टाळाटाळ केली जाते. आपण नियम तोडलाच नाही, असे ठणकावून सांगतात. अनेक राजकीय नेत्यांचे वजन वापरुन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. याला आळा घालण्यासाठी महिन्यापूर्वी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी वाहतूक शाखेत ई-चलन प्रणाली सुरूकेली आहे. या माध्यमातून वाहतूक नियम तोडणाºया वाहनधारकांचे फोटो वाहतूक पोलिस मोबाईलवर घेत आहेत.

फोटो घेतल्यानंतर वाहनाच्या क्रमांकावरून मालकाचे नाव व पत्ता समजतो. तसे सॉफ्टवेअर प्रत्येक पोलिसाच्या मोबाईलवर घेण्यात आले आहे. वाहनधारकाचे नाव, पत्ता समजल्यानंतर त्याला घरी नोटीस पाठवून सात दिवसांत वाहतूक शाखेत दंड भरावा, अन्यथा खटला दाखल केला जाईल, असा इशारा दिला जातो.

मोबाईलवर घेतलेल्या फोटोत संबंधित वाहनधारकाचे वाहन, त्याने कोणत्या प्रकारचा नियम तोडला आहे, याचे चित्रण, वेळ, ठिकाण येत आहे. या सर्व बाबींचा उल्लेख नोटिशीत असतो. त्यामुळे वाहनधारकांना खोटे बोलण्याची संधी मिळत नाही. ह्यई-चलनह्ण असे या कार्यप्रणालीस नाव देऊन गेल्या महिन्यापासून कारवाई सुरू ठेवली आहे. दंड किती वसूल झाला, यापेक्षा आपण चुकलो असतानाहीपोलिसांशी वाद घातला, हे घरी नोटीस आल्यानंतर वाहनधारकांना समजत आहे.

सीसीटीव्ही, सिग्नल बसणार!शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राजवाडा चौक, पुष्पराज चौक, आझाद चौक, सिव्हिल चौक येथे सिग्नल बसविण्यात आले आहेत. कॉलेज कॉर्नर, आमराई आदी गर्दीच्या चौकात सिग्नल बसविण्याचे नियोजन सुरु आहे. ह्यई-चलनह्ण प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी व गुन्ह्यांची उकल, तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पोलिसांना निधी मिळणार आहे.

दंड किती वसूल झाला, यापेक्षाही वाहनधारकांना वाहतूक नियम व शिस्त लागली पाहिजे. दंडात्मक कारवाईचा बडगा उगारताना अनेकदा वादाचे प्रकार आजही घडतात. ई-चलनमुळे मी चूक केली नाही, मग दंड का भरू, असे वाहनधारकांना आताम्हणता येत नाही. दंड जरी भरण्यास नकार दिला तरी, त्याच्याकडून ई-चलनच्या माध्यमातून वसूल करता येत नाही. या प्रणालीचा आणखी प्रभावीपणे वापर केला जाईल.- अतुल निकम,सहाय्यक पोलिस निरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.