शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या नगरसेवकासह ६ जणांवर गुन्हा

By admin | Updated: February 6, 2017 01:11 IST

सांगलीतील गोळीबार प्रकरण; कार्यकर्त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कृत्य

सांगली : येथील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे गोवर्धन चौकात अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय २२) या तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी पंढरपूर (जि. सोलापूर) येथील नगरसेवक संदीप पवार यांच्यासह सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक संदीप पवार, अर्जुन पवार, सचिन चौगुले, भैया पवार, नागेश धोत्रे व रामा पवार (सर्व रा. पंढरपूर) यांचा समावेश आहे. बबलू सुरवसे हा मूळचा पंढरपूरचा आहे. दोन वर्षांपूर्वी पंढरपूरमध्ये नीलेश माने या तरुणाचा खून झाला होता. या खूनप्रकरणी बबलूला अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी त्यास सांगलीत मामाकडे राहायला पाठविले होते. तेव्हापासून बबलू सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे मामाकडे राहतो. त्याच्या मामांचा बांबू विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी मामाच्या दुकानातून शहरात कामानिमित्त दुचाकीवरून येताना सहाजणांच्या टोळीने त्याच्यावर गोळीबार केला होता. नेम चुकल्याने बबलू बचावला होता. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने भेट देऊन संशयितांच्या शोधासाठी नाकाबंदी केली होती. रात्री उशिरापर्यंत बबलूकडे चौकशी केली जात होती. त्यानंतर त्याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.पंढरपूरमध्ये खून झालेला नीलेश माने हा नगरसेवक संदीप पवार यांचा कार्यकर्ता होता. दोन वर्षापूर्र्वी भरदिवसा त्याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात बबलूसह सहा ते सात संशयितांना अटक करण्यात आली होती. बबलूला अटक झाल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनाही मारहाण झाली होती. तेव्हापासून बबलूचे कुटुंब घाबरुन होते. त्यामुळे बबलू जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला सांगलीत मामाकडे रहायला पाठविले होते. नीलेश माने याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नगरसेवक संदीप पवार व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे बबलूने फिर्यादीत म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक येत्या एक-दोन दिवसात पंढरपूरला रवाना होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी पंढरपूर पोलिसांशी संपर्क साधून बबलूविरुद्ध दाखल असलेला गुन्हा, नीलेश मानेचा खून कशातून झाला होता? नगरसेवक संदीप पवार यांची पार्श्वभूमी याची माहिती घेतली आहे. (प्रतिनिधी)