शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘सागरेश्वर’मध्ये ५७२ प्राणी

By admin | Updated: May 25, 2017 23:25 IST

‘सागरेश्वर’मध्ये ५७२ प्राणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या प्राणीगणनेत मागील काही वर्षांच्या तुलनेत हरणांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या प्राणीगणनेनुसार सांबर व चितळ जातीच्या हरणांसह ५७२ प्राणी आढळून आले आहेत. तर काळवीट जातीची हरणे अभयारण्यात आढळून आली नसल्याचे प्राणीगणनेवरून दिसून येत आहे. अभयारण्याचे वैभव असणारे हरिण जातीचे प्राणीच कमी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.अभयारण्यातील प्राणीगणनेचा मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास प्राण्यांची संख्या सुरुवातील झपाट्याने वाढल्याचे व नंतर कमी झाल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेमध्ये चितळ - १२३ आणि सांबर -३६२ जातीची हरणे आढळून आली आहेत. याचबरोबर ससे - १४, रानडुक्कर -३४, वानर - ३७, कोल्हा - २ असे प्राणी आढळून आले आहेत. काळवीट, लांडगा, तरस, घोरपड, भेकर जातीचे प्राणी अरण्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. अभयारण्य हरणासाठी प्रसिध्द आहे. सुरुवातीला काळवीट, सांबर, चितळ जातीच्या १२ जोड्या सोडण्यात आल्या. अभयारण्यातील मृगविहार येथे तारेचे कुंपण घालून त्यामध्ये हरणे सोडण्यात आली होती. हळूहळू हरणांच्या संख्येत वाढ होऊ लागली. त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही ही हरणे अभयारण्याच्या विस्तारित क्षेत्रात मुक्त करण्यात आली. हरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली आणि अभयारण्यातील चारा कमी पडू लागला, पाण्याची टंचाईही निर्माण झाली आहे.संख्येत किंंचीत वाढ शक्यप्राण्यांची गणना करतेवेळी आठ टीम तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रत्येकी ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तीन दिवस पाहणीवरून आकडेवारी काढण्यात आली. यामध्ये किंचीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी सांगितले.