शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींविरुद्ध ५६ कर्मचारी न्यायालयात

By admin | Updated: February 23, 2015 23:57 IST

किमान वेतनासाठी लढा : हजारो कर्मचारी वर्षानुवर्षे राबताहेत तुटपुंज्या वेतनावर

सांगली : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार २०० कर्मचारी स्वच्छता, पाणी पुरवठ्याची कामे करीत आहेत. यापैकी १ हजार कर्मचारी दीड ते दोन हजार अशा तुटपुंज्या वेतनावर ग्रामपंचायतींमध्ये राबत असून, कोणत्याही रजेचा त्यांना लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतींकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींमधील ५६ कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी कामगार कोर्टात धाव घेतली आहे. उर्वरित कर्मचारीही लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे नेते अ‍ॅड. कुंभार यांनी सांगितले.कामगार कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान वेतन ७ हजार १०० रुपये आणि महागाई भत्ता १ हजार ७७५ रुपये असे एकूण आठ हजार ८७५ रुपये मिळाले पाहिजेत. परंतु, जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ६० टक्के ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना किमान वेतनच देत नाहीत.शासनाचा आदेशच शासनाच्या ताब्यातील स्थानिक स्वराज संस्था पाळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ७०४ ग्रामपंचायतींमध्ये सध्या २ हजार २०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १ हजार २०० कर्मचाऱ्यांना कागदोपत्री किमान वेतन दिले जात आहे. परंतु, येथील कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन मिळत नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. १ हजार कर्मचाऱ्यांना किमान वेतन लांबच ते दीड ते दोन हजार रुपयांवर पंधरा ते सोळा तास राबत आहेत. या कर्मचाऱ्यांनी किमान वेतनाची मागणी केल्यास त्यांना कामावरून कमी करण्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणला जातो. यामुळे हजारो कर्मचारी न्यायापासून वंचित राहिले आहेत.या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सरसावली असून, त्यांनी कामगारांसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. कडेगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, पलूस, जत तालुक्यातील ५६ कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून किमान वेतन मिळत नसल्याचा दावा कामगार कोर्टात (न्यायालय) दाखल केल्याचे अ‍ॅड. कुंभार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)न्यायालयात गेलेले कर्मचारीग्रामपंचायतकर्मचारीनेर्ले८खेराडे-वांगी४ढाणेवाडी४कडेगाव१६सासपडे१येतगाव१सोनी९ढोलेवाडी१कोकळे२हिवरे१बिळूर९एकूण५६जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी गुरुवार, दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. कुंभार यांनी केले असून, शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचाही कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे.