शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ५५ रिक्षा जप्त

By admin | Updated: July 10, 2014 23:18 IST

दंडात्मक कारवाई : वाहतूक पोलिसांची मोहीम

सांगली : नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या पेट्रोल व डिझेल रिक्षाचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या दोन दिवसात ५५ रिक्षा जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन रिक्षा सोडण्यात येत आहे. मात्र अद्याप १५ रिक्षा वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयाजवळ आहेत. ही कारवाई आणखी तीव्र करणार आहे, असा इशारा पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिला आहे.रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांची रिक्षाचालकांनी माहिती द्यावी, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी चार दिवसांपूर्वी सांगली, मिरजेतील रिक्षाचालकांची बैठक घेतली होती. त्यावेळी पेट्रोल व डिझेल चालकांनी एकमेकांची उणी-दुणी काढली होती. पेट्रोल चालकांनी डिझेल रिक्षाची टप्पा वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती, तर डिझेल चालकांनी विनापरवाना अनेक रिक्षा फिरत आहेत, बॅचबिल्लाही त्यांच्याकडे नाही, या चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सावंत यांनी कारवाईचे आदेश दिले होते.गेल्या दोन दिवसांपासून नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या चालकांवर कारवाई सुरु केली होती. यामध्ये डिझेलची टप्पा वाहतूक, परमीट नसताना रिक्षा चालविणे, परवाना नसणे, नंबरप्लेट नसणे असे कारवाईचे स्वरुप आहे. ५५ रिक्षा जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड भरणाऱ्या रिक्षा सोडून दिल्या जात आहेत, दंड न भरणाऱ्या रिक्षा कार्यालयाच्या आवारात आहेत. (प्रतिनिधी)