शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू ठेक्याचे ५१ प्रस्ताव पर्यावरण समितीकडे

By admin | Updated: November 7, 2014 23:39 IST

वाळू महागली : बांधकाम व्यवसाय ठप्प; वाळूचा दर महिन्यात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले

सांगली : यावर्षीचे वाळूचे ५१ प्रस्ताव राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, वाळूचा दर गेल्या महिन्याभरात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढला आहे. याचा बांधकाम व्यवसायावरही परिणाम झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यातून वाळू उपशासाठी १२५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना पर्यावरण समितीने मंजुरीही दिली होती. यामधील प्रत्यक्षात ५२ वाळू प्लॉटच्या ठेक्यांनाच मागणी झाल्याने त्यांचे लिलाव काढण्यात आले होते. यामधून जिल्हा प्रशासनाला सुमारे ३६ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. या प्लॉटसाठीची उपसा मुदत सप्टेंबरअखेर संपली आहे. यावर्षी वाळू प्लॉट लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ५१ वाळू प्लॉटसाठी ग्रामसभेचीही मंजुरी घेण्यात आली आहे. ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आलेले ५१ वाळूचे प्रस्ताव आता आठवड्यापूर्वीच मंजुरीसाठी पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आले आहेत. पर्यावरण समितीकडून आठवड्याभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासाठी प्लॉटचे प्रशासकीय दर विभागीय आयुक्त निश्चित करणार आहेत. यावर्षीही लिलाव आॅनलाईनच काढण्यात येणार आहेत. वाळू उपसा बंद झाल्याने वाळूचे दर मात्र भडकले आहेत. गेल्या महिन्यात साडेचार ते पावणेपाच हजार रुपये ब्रास असणारी वाळू आता साडेसहा हजार रुपये ब्रास झाली आहे. सध्या शिल्लक वाळूच विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाळू नसल्यामुळे बांधकाम व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. सर्वसाधारणपणे बांधकाम व्यवसाय हा आॅक्टोबर ते मेअखेर चालणार आहे. (प्रतिनिधी)वाळूचे दर दोन हजारने वाढलेगेल्या महिन्याभरात वाळूचे दर ब्रासला दोन हजार रुपये वाढले आहेत. गेल्या महिन्यात वाळूचा दर साडेचार हजार रुपये होता, तो आता साडेसहा हजाराच्या घरात गेला आहे. यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वाळू विक्रेते संतोष पाचुंदे यांनी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांतूनही वाळूची वाहतूक सध्या बंद आहे. यामुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे. पर्यावरण समितीकडे ५१ वाळूचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यापुढेही ग्रामसभेच्या मंजुरीनंतर आणखीन वाळू प्रस्ताव पर्यावरण समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. - देवदत्त ठोंबरे, प्रभारी खणीकर्म अधिकारी, सांगली