शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे ५०० बदली कामगार कायम होणार

By admin | Updated: August 28, 2014 23:04 IST

तत्त्वत: मान्यता : प्रतीक्षा मुख्यमंत्र्यांच्या सहीची !

सांगली : महापालिकेकडे गेली २५ वर्षे बदली कामगार म्हणून काम करणारे ५०० कर्मचारी लवकरच कायम होणार आहेत. पालिकेच्या प्रस्तावाला नगरविकास सचिवांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेला आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर सव्वा कोटीचा बोजा पडणार आहे. नगरपालिकेपासून ५०८ बदली कामगार महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ, उपनगरांचा वाढता विस्तार यामुळे स्वच्छता व कचरा उठाव यंत्रणा अपुरी पडत आहे. रस्ते, गटारी, शौचालयांची स्वच्छता करताना सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार रस्त्यासाठी ९६०, गटार स्वच्छतेसाठी ३५५, तर शौचालयासाठी ५० अशी सुमारे १३६५ कामगारांची आवश्यकता आहे. सध्या ७५० कामगार कायम सेवेत आहेत. अद्याप किमान ६१५ कर्मचारी कमी पडतात. त्यातच गेल्या २० वर्षांपासून नव्याने नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने ५०८ बदली कामगार सफाईच्या कामासाठी घेतले होते. या बदली कामगारांना १९० रुपये दिवसाला मिळतात, तर कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना ३५० ते ४०० रुपये वेतन मिळत आहे. त्याशिवाय इतर सुविधाही दिल्या जातात. या कामगारांनी सेवेत कायम करावे, यासाठी वेळोवेळी लढा दिला. चार वर्षांपूर्वी ५०८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठराव महापालिकेने करीत अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता. पण शासनाने मध्यंतरी या प्रस्तावाला रेड सिग्नल दाखविला. पालिकेची आर्थिक स्थिती व आस्थापना खर्च जादा असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. पालिकेत काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पुन्हा या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. सध्या ५०८ कामगारांपैकी ११ जण मृत झाले आहे. त्यामुळे आता ४९७ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले जाणार आहे. अखेर नगरविकासचे उपसचिव प्रभाकर पवार, कक्ष अधिकारी आंबार्डेकर, उपकक्ष अधिकारी साने यांनी हा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेला असून, त्यांच्या सहीनंतर त्याला अंतिम रूप येणार आहे. या निर्णयामुळे गेली कित्येक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या सफाई कामगारांना न्याय मिळणार आहे. (प्रतिनिधी)