सांगली स्पोर्ट्स फाउण्डेशनतर्फे आयोजित मैदानी खेळांच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण अरविंद तांबवेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जतीन शहा, राजू बावडेकर, प्रमोद शिंदे, नंदिनी पांढरे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली स्पोर्ट्स फाउण्डेशनच्या मैदानी खेळ शोधमोहिमेत पाचशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले. दहा विविध गटांत स्पर्धा झाल्या. ज्येष्ठ व्यावसायिक अरुण दांडेकर यांनी उद्घाटन केले. यावेळी जतीन शहा, राजू बावडेकर, प्रमोद शिंदे, अविनाश सावंत, सचिन स्वामी, नंदिनी पांढरे, रसिका माळी, श्रीराज सांभारे, नीळकंठ कोरे आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण भाजप नेते अरविंद तांबवेकर यांच्या हस्ते झाले.
निकाल असा : ५० मीटर धावणे- समरजित शिंत्रे, आर्यन सावंत, रजत नलवडे, स्वरा आनंदे, समृद्धी गुंडदळ, आलीया शेख, वेदांत खंडागळे, आर्यन सोलनकर. १०० मीटर धावणे- केतन पाटील, कृष्णा कपाले, श्रेयस मोरबाळे, वर्षा माने, श्रावणी माने, भक्ती जाधव, रुद्राक्ष मगदुम, श्रीवर्धन बेडगे, आर्यन सोलनकर, विकास यादव, कोंडीबा कोळेकर, साईराज बोळाजे, प्रणाली सुपे, साक्षी माळी, साक्षी बाणकर. ३०० मीटर- केतन पाटील, श्रेयस मोरबाळे, सार्थक पाटील, वैष्णवी माने, वर्षा माने, जुबिया मुलाणी, रुद्राक्ष मगदुम, पार्थ कदम, मयूरेश मदने, अनंत यादव, हर्षवर्धन माने, तेजस पवार, प्रणाली सुपे, साक्षी माळी, हर्षदा म्हसवेकर. ६०० मीटर- तन्मय सूर्यवंशी, अथर्व खामकर, यश कांबळे, वैष्णवी माने, जुबिया मुलाणी, साधना वडर, ईशान फाळके, ऋग्वेद आंबे, अथर्वराज पाटील, कमला चौधरी, आयुष्का धोतरे, शरयू माने. शॉट पुट- कुणाल म्हारगुडे, श्रेयस माळी, अथर्व खांडेकर, भक्ती जाधव, संजीवनी वाघमोडे, श्रेया राजमाने, भूषण साळवी, निलादित्य शिंदे, प्रथमेश राजमाने. लांब उडी- ऋग्वेद आंबे, विकास यादव, ईशान फाळके, प्रणाली सुपे, कमला चौधरी, आयुष्का धोतरे.
--------------