शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ५० टन फायली अनावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:02 IST

स्वच्छता मोहिमेचा परिणाम : आठवड्यात झिरो पेन्डसी; फायलींचे ई-ट्रॅकिंग १ आॅगस्टपासून होणारसांगली : वर्षानुवर्षे कागदी दफ्तरात अडकलेली जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांची कार्यालये आता डिजिटल होऊ पाहात आहेत. विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून पुणे विभागात अभिलेख वर्गीकरण मोहीम सुरू आहे. ५३ वर्षांच्या दफ्तरांचे वर्गीकरण करून अनावश्यक दफ्तर निकाली काढण्यास सुरुवात झाली ...

ठळक मुद्दे३१ जुलैपूर्वी फायलींचा निपटारा करण्याचे आदेशआॅगस्टपासून आलेल्या प्रत्येक अर्जावर तातडीने निर्णय अपेक्षितया मोहिमेत जमा झालेले कागद न जाळण्याचे आदेश यापूर्वी दिले दोषींवर कारवाईच केली जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला

स्वच्छता मोहिमेचा परिणाम : आठवड्यात झिरो पेन्डसी; फायलींचे ई-ट्रॅकिंग १ आॅगस्टपासून होणारसांगली : वर्षानुवर्षे कागदी दफ्तरात अडकलेली जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांची कार्यालये आता डिजिटल होऊ पाहात आहेत. विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून पुणे विभागात अभिलेख वर्गीकरण मोहीम सुरू आहे. ५३ वर्षांच्या दफ्तरांचे वर्गीकरण करून अनावश्यक दफ्तर निकाली काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून सुमारे ५० टन अनावश्यक फायली आढळल्याने त्या रद्दीत घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.येत्या आठवड्यात झिरो पेन्डसीसह फायलींचे ई-टॅकिंग करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत गेल्या पंधरा दिवसांपासून ‘झिरो पेंडन्सी’ची लगबग सुरु आहे. आणखी चार दिवस किमान कागदपत्रांची वर्गवारी करण्यात जाणार आहेत. या मोहिमेत जमा झालेले कागद न जाळण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत. या अनावश्यक रद्दीची विक्री करण्यासाठी ई-निविदा प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती जिल्हा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, दहा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून मागील पंधरा दिवसात केलेल्या फायलींच्या वर्गीकरणात सुमारे ५० टन कालबाह्य कागदपत्रे सापडली आहेत. या फायली ५३ ते ४० वर्षे जुन्या आहेत. सध्या या फायलींचा काहीच उपयोग नसल्यामुळे निविदा मागवून त्यांचा लिलाव करून विक्री केली जाणार आहे. यातून जो पैसा मिळेल तो स्वीय निधीत जमा केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.कागदपत्रांची वर्गवारी करताना झेडपीचे सोळा विभाग, दहा पंचायत समित्यांकडील शेकडो पोती कागदपत्रे एकत्रित करण्यात आली आहेत. काही जुनी संदर्भपुस्तकेही सापडली आहेत.

काही विभागानी कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. वाळवा, कवठेमहांकाळ, जत आणि शिराळा तालुक्यांचे कामकाज संथगतीने सुरू आहे. या तालुक्यांना पालक अधिकाºयांची नेमणूक केली आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व कागदपत्रांचे वर्गीकरण अपेक्षित आहे. १ आॅगस्टपासून आलेल्या प्रत्येक अर्जावर तातडीने निर्णय अपेक्षित आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील सोळा विभागात कोणत्याही व्यक्तीची कधी फाईल आणि त्यावर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी काय निर्णय घेतला, किती दिवस त्यांच्या टेबलवर फाईल प्रलंबित होती, याची माहिती ई-ट्रॅकिंगमध्ये सापडणार आहे.या मोहिमेची सुरुवात दि. १ आॅगस्टपासून सुरु होणार असल्यामुळे सर्वच विभागातील नियमित कामकाज बंद करून स्वच्छतेची मोहीम वेगाने सुरु झाली आहे. दि. ३१ जुलैपूर्वी फायलींचा निपटारा करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.अ’ वर्गीय फायलींचा लाल रंगाचा गठ्ठा कायमस्वरूपी असून, ‘ब’ वर्गीय हिरवा रंगाचा गठ्ठा ३० वर्षापर्यंत, ‘क’ वर्गीय पिवळा दहा वर्षे, ‘क-१’ पांढरा रंगाचा पाच वर्षाचा, तर ‘ड’ वर्गीय गठ्ठा एक वर्षापर्यंतच ठेवणार आहे.झिरो पेंडन्सी : मंगळवारपासूनमंगळवार, दि. १ आॅगस्टपासून एकाही अधिकारी, कर्मचाºयाच्या टेबलवर फायली आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येकदिवशी आलेला अर्ज आणि फायलींचा निपटारा त्याचदिवशी झाला पाहिजे. याबाबत एक जरी तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही सीईओ राऊत यांनी दिला आहे. जुनी कागदपत्रे काढण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांचा जास्त वेळ गेला आहे. यामुळे मागील आठ दिवसांपासून काही फायली प्रलंबित राहिल्या आहेत. या फायलींचा निपटारा करण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी द्यावा लागणार आहे. त्यानंतर मात्र कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कारवाईच केली जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.