शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्व भागातून दररोज ५० टन केळीची निर्यात

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

रोपांची वाढती मागणी : अडीचशे एकरात केळीची लागवड

टाकळी : मिरज पूर्व भागातील शेतकरी खर्च कमी व उत्पादन जास्त देणाऱ्या पिकांकडे वळत आहे. ऊस उत्पादन घेणारा शेतकरी केळी उत्पादनाकडे वळला असून मिरज पूर्व भागामध्ये २५० एकर क्षेत्रातात लागवड झाली आहे. दररोज ५० टन केळीची निर्यात केली जात आहे.पूर्व भागातील शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्षशेतीकडे मोठ्याप्रमाणात वळले. पण द्राक्ष उत्पादन खर्च व मिळणारा भाव यात तफावत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. द्राक्षशेतीपेक्षा केळी उत्पादन शेतकऱ्यांना फायद्याचे होत असल्याने पूर्व भागातील एरंडोली, सलगरे, बेळंकी, मल्लेवाडी, आरग, बेडग, टाकळी, बोलवाड येथील शेतकऱ्यांचा केळी उत्पादनाकडे कल वाढला आहे. पूर्व भागात सुमारे २५० एकर क्षेत्रामध्ये केळी उत्पादन घेतले जात आहे. पूर्व भागातून दररोज ५० टन केळी निर्यात केली जात आहे. स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना टनास १२ ते १४ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॉक्स पॅकिंग व वाहतुकीचाही खर्च वाचत आहे. एक वर्षात एकरी ३५ ते ४० टन केळीचे उत्पन्न शेतकरी काढत आहेत. द्राक्षशेतीच्या तुलनेत उत्पादन खर्चही कमी असल्याने केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बोलवाड येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण पाटील यांनी पाच एकर केळी बाग लावली आहे. त्यांनी एकरी ३५ ते ३७ टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेमुळे ढबू, टोमॅटो तसेच ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर होता. औषध व मजुरांचा खर्च अत्यल्प असल्याने केळी उत्पादनाला शेतकरी महत्त्व देऊ लागला आहे. पूर्व भागात द्राक्ष, ऊस उत्पादनाची जागा केळीच्या बागा घेऊ लागल्याचे चित्र आहे. सुशिक्षत तरूणांचा केळीच्या शेतीकडे सर्वाधिक कल आहे. (वार्ताहर)रोपांचा तुटवडाजळगाव येथून केळीची रोपे आयात केली जातात. एक रोप परिपूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून रोपांना वाढती मागणी आहे. रोपांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी मे महिन्यासाठी रोपांची मागणी नोंदवली आहे, असे मत बोलवाडचे रोपे विक्रेते रवींद्र पाटील यांनी सांगितले.