शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास लाखांची खंडणी : पाचजणांवर गुन्हा

By admin | Updated: November 6, 2014 00:02 IST

पोलीसप्रमुखांच्या आदेशानुसार कारवाई : वाघवाडीतील प्रकार

इस्लामपूर : वाघवाडी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या व्यावसायिकास पन्नास लाखांच्या खंडणीसाठी धमकावून, दहा ते बाराजणांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी केवळ मारहाण व गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल करुन संशयितांना अभय दिले होते. मात्र यातील पीडित कुटुंबाने आज बुधवार सांगलीत जिल्हा पोलीसप्रमुखांची भेट घेऊन कैफियत मांडल्यावर, त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा मोहन काशिनाथ मदने याचेसह चार ते पाचजणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.भावेश नारायण पटेल (वय २५, रा. वाघवाडी फाटा) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. मोहन काशिनाथ मदने, शंकर लोहार व इतर १0 ते १२ जणांसह आई-वडील, मामेभाऊ अशा नातलगांनी रविवारी रात्री पटेल यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. भावेश पटेल यांच्या डोक्यात खुर्ची घालून मोठी दुखापत केली आहे. गेल्या महिन्याभरापासून मदने हा पटेल यांच्याकडे पैशाची मागणी करीत होता. ‘नाही तर जागा खाली करा, तुमची जागा दुसऱ्याला विकून टाकणार’, अशी भीती घालत होता. भावेश पटेल यांचे फाट्यावर सिमेंटच्या चौकटी विकण्याचे एस. के. ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. महामार्गालगतची १५ गुंठे जागा त्यांनी जुलै २०१४ मध्ये खरेदी केली आहे. या जागेशी मदने याचा संबंध नसताना, तो पैशाची मागणी करीत होता, असे पटेल कुटुंबियांनी सांगूनही पोलिसांनी फिर्यादीत त्याचा उल्लेख न करता, केवळ मारहाण व गर्दी मारामारीचा गुन्हा नोंद केला. यामुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, पोलिसांच्या या बोटचेपेपणामुळे पटेल कुटुंबाने आज जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर मदने याच्याकडून सुरु असलेल्या त्रासाची माहिती दिली. यावेळी इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक आनंद पाटील सुध्दा तेथे उपस्थित होते. सावंत यांनी पाटील यांना, चौकशीअंती कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार पटेल कुटुंबीय बुधवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षकांकडे आले होते. अखेरीस रात्री उशिरा का होईना पोलिसांकडून मोहन मदने व चार ते पाचजणांविरुध्द खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. (वार्ताहर)