शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पुणदीतील संस्थेस ५0 लाखांचा गंडा

By admin | Updated: August 12, 2014 23:18 IST

तिघांवर गुन्हा : ठेकेदार कंपनी कोल्हापूरमधील, धनादेशाद्वारे पैसे दिले

तासगाव : पुणदी (ता. तासगाव) येथील सावित्रीबाई फुले बॅकवर्ड को—आॅप. इंडस्ट्री या संस्थेतील इलेक्ट्रीक कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने संस्थेची ५0 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे संचालक संजय शंकर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी कोल्हापूर येथील शिवम इलेक्ट्रीकलचे अभिजित रमेश यादव, त्याचा भाऊ अनिरुध्द व वडील रमेश शंकर यादव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामासाठी अभिजित यादव यास २0 डिसेंबर २0१२ रोजी धनादेशाद्वारे पैसे अदा करण्यात आले होते.कच्च्या लोखंडापासून सळई तयार करण्याचा हा प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या इलेक्ट्रीक कामांची निविदा २५ आॅगस्ट २0१२ रोजी काढली होती. वर्तमानपत्रात निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार शिवम इलेक्ट्रीकल यांची ७७ लाख ७५ हजारांची निविदा प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग पुणे यांनी १0 सप्टेंबर २0१२ रोजी मंजूर केली. निविदा मंजूर झाल्यानंतर अभिजित यादवने संस्थेकडे इलेक्ट्रीकल साहित्य खरेदी व इतर खर्चासाठी ५0 लाख रुपयांची मागणी केली. मागणीप्रमाणे संस्थेच्या देना बँकेतील कर्जखात्यातून ५0 लाखांचा धनादेश २0 डिसेंबर २0१२ रोजी अभिजित यादव यास देण्यात आला. पण धनादेश वठल्यानंतरही कामाला सुरुवात झाली नाही. ७—८ महिने होऊनही अभिजित यादव उडवाउडवीची उत्तरे देत होता. संस्थेचे संचालक त्याला घरी भेटण्यास गेल्यानंतर, त्याचा भाऊ अनिरुध्द व वडील रमेश यादव यांनी त्यांना कोल्हापूरच्या गुंडांकडून हिसका दाखवू, अशी धमकी दिली. तपास पोलीस निरीक्षक रमेश बनकर करीत आहेत. (वार्ताहर)