शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

एलबीटीचे ५० कोटी थकले

By admin | Updated: June 27, 2014 00:44 IST

अजिज कारचे : व्यापाऱ्यांकडून वसुली करणारच

सांगली : महापालिका हद्दीतील एलबीटीपोटी ग्राहकांकडून गोळा केलेली सुमारे ५० कोटींहून अधिक रक्कम व्यापाऱ्यांकडे थकित आहे. या रकमेची वसुली केली जाईल, असे आयुक्त अजिज कारचे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास (आरटीओ) आपटा पोलीस चौकीजवळील शाळा क्रमांक आठची जागा देण्यासही त्यांनी सहमती दर्शविली.आयुक्त कारचे यांनी आज वीज मंडळ, आरटीओंशी संबंधित प्रश्नांवर बैठक घेतली. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग, वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता कागे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे उपस्थित होते. एलबीटीबाबत भूूमिका मांडताना कारचे म्हणाले की, एलबीटी वसुलीबाबत महापालिकेची सर्वच पर्यायांबाबत तयारी आहे. सध्या शासनस्तरावर निर्णय प्रलंबित असला तरी, एलबीटीची वसुली थांबलेली नाही. जून महिन्यात चार कोटी ९० लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे. गेल्या वर्षभरात व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून एलबीटी वसूल केला आहे. पण तो महापालिकेकडे भरलेला नाही. भविष्यात या रकमेची वसुली होणार आहे. सुमारे ५० कोटींहून अधिक रक्कम व्यापाऱ्यांनी गोळा केली आहे, असेही ते म्हणाले. आरटीओ कार्यालयाने आपटा पोलीस चौकीजवळील शाळा क्रमांक आठची जागा तात्पुरत्या स्वरुपात देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यादृष्टीने जागेची पाहणी करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयातील कर्मचारी व तेथील खोकीधारकांचे स्थलांतर केले जाणार आहे. पण त्यासाठी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे, असेही कारचे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या एक्स्प्रेस फिडरला थेट वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र केबल टाकण्याचे निर्देश वीज मंडळाला दिले आहेत. त्यांनीही त्याला सहमती दर्शविली आहे. मंगळवारी वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)