शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

सांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख, नीलम गोऱ्हे अंकली गाव दत्तक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:59 IST

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगली नगरवाचनालयासाठी त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत करत असल्याचे तसेच उभारी देण्यासाठी अंकली हे गाव दत्तक घेत असल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे सांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख, नीलम गोऱ्हे अंकली गाव दत्तक घेणारपूरपश्चात उपाययोजनांसाठी यंत्रणांची प्रयत्नांची शिकस्त : डॉ.नीलम गोऱ्हे

सांगली : पूरपश्चात उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत असल्याचे सांगून शासकीय मदत वाटपात दिव्यांग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्य द्या. त्यांना घरी जावून मदतीचे वाटप करा. विविध महामंडळांच्या माध्यमातून आवश्यक मदत उपलब्ध करून घ्या, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. यावेळी त्यांनी सांगली नगरवाचनालयासाठी त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत करत असल्याचे तसेच उभारी देण्यासाठी अंकली हे गाव दत्तक घेत असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील सांगलीवाडी, अंकली, हरिपूर रोड, रामनगर, जुनी धामणी आदि विविध ठिकाणी भेटी देवून, लोकांशी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संवाद साधला. त्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थिती व पूरपश्चात करण्यात येणाऱ्या उपाययोजना यामध्ये धान्य वाटप, मदत, सानुग्रह अनुदान आदिंबाबत सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. तेली यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी मदत व पुनर्वसन कार्याचा आढावा घेऊन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ज्या ठिकाणी दिव्यांग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक पुरबाधित आहेतत्यांना घरी जावून मदतीचे वाटप करा. आज ग्रामीण भागामध्ये भेटी देत असताना महिलांच्या कपड्याची उपलब्धता होणे आवश्यक असल्याचे सांगून दानशूर व्यक्तींनी प्राधान्याने ही मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले. जी विविध महामंडळे कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून मदत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पुरबाधित भाडेकरू वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. नुकसानग्रस्त पशुबाधितांना शासनाकडून उपलब्ध होणारे पशुधन पती पत्नी या दोहोंच्या नावावर देण्यात यावे असे सांगून शासकीय पंचनामे, सर्व्हे अथवा अनुदान वाटप यासाठी ज्या भागामध्ये अधिकारी, कर्मचारी जाणार आहेत त्याची माहिती लोकांना कळवावी. शेतकऱ्यांना अडचण निर्माण होवू नये यासाठी लागणारी छोटी औजारेही त्वरीत उपलब्ध करून द्यावीत.महिलांमधील अशक्तपणाची तक्रार दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात. साथीचे रोग पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगितले. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जास्त काळ पाणी व चिखल यामध्ये रहावे लागते त्यांना लेप्टोपायरासेस पासून संरक्षणासाठी गमबूट उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देवून गोऱ्हे यांनी पुरबाधितांना मदतीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणारे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी निलम गोऱ्हे यांनी सांगली नगरवाचनालयाचे महाप्रलयामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली. तसेच जिल्ह्यातील जी वाचनालये पुरबाधित झाली असतील त्यांनीही प्रशासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव दाखल करावेत असे सांगितले. यावेळी सांगली महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेले अन्नछत्र अत्यंत चांगले असल्याबद्दल महापालिकेचे कौतुक केले. तसेच जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंचे जे किट तयार केलेले आहे त्याबध्दलही प्रशंसा व्यक्त केली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापूराच्या पार्श्वभूमीवर झालेले नुकसान, पूरपश्चात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, मदत स्वीकृती व वितरण आदिंबाबत सविस्तर आढावा सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी पाणीपुरवठा, आरोग्य यंत्रणा आदिंबाबत माहिती दिली. 

 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारी