शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कारखान्यांकडे ४३९ कोटी अडकले

By admin | Updated: December 12, 2015 00:15 IST

ऊस बिलाचा तिढा : साखरसम्राट-संघटनांच्या संघर्षात शेतकऱ्यांची फरफट; शासनाची बघ्याची भूमिका

अशोक डोंबाळे -- सांगली --जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड-दोन महिने झाले असून, १७ लाख ८८ हजार ७८७ टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाचे ४३९ कोटी ७५ लाख ७४ हजार ४० रुपयांचे बिल साखर कारखानदारांकडे थकित आहे. शासनाने एफआरपीचा तोडगा काढला नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रूपयाही दिलेला नाही.जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २१ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधित सुरू झाला. त्याला जवळपास दीड ते दोन महिने झाले आहेत. वसंतदादा कारखान्याने सर्वाधिक दोन लाख १९ हजार ७७० टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याकडे चालू हंगामातील ५० कोटी ५४ लाख ७१ हजारांचे बिल थकित आहे. राजारामबापू, विश्वास, क्रांती, हुतात्मा साखर कारखान्यांचेही प्रत्येकी ३० ते ५० कोटींचे बिल थकित आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एक रुपयाचेही बिल दिलेले नाही. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांची ४३९ कोटी रूपयांची बिले थकित आहेत. याबद्दल शासन, संघटना आणि कारखानदार एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. कारखानदार मात्र साखरेचे दर स्थिर नसल्यामुळे आणि एफआरपीविषयी शासनाने भूमिका स्पष्ट केली नसल्याने बिल दिले नसल्याचे सांगत आहेत. साखर कारखानदार, शासन आणि संघटनांच्या संघर्षात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारनेही एफआरपीच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याची गरज होती. परंतु, सरकार साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार आहे. सध्या लग्नसराई सुरू असून, घरातील लग्नकार्यासाठी खर्चाला पैसे नसल्यामुळे शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत आहेत. अनेक शेतकरी कारखानदारांचे उंबरे झिजवत असूनही बिल जमा होत नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकित रक्कमकारखाना (मे. टन) ऊस गाळपउतारा टक्के थकित रक्कमवसंतदादा२१९७७०९.६४५०५४७१०००राजारामबापू (साखराळे)११९७२०११.७१३१८६९४६४०विश्वासराव नाईक१५५९५०१०.२०३९६४२४९००हुतात्मा१६४९८५११.५५४२७९६१०००माणगंगा १६३७०८.३०३४३७७०००महांकाली५६५६०९.७८१३००८८०००राजारामबापू (वाटेगाव)११९०९५११.३०३०९६४७०००डफळे८१८४०९.९२१८८२३२०००सोनहिरा१५२८६२११.४४३८२१५५०००क्रांती२०२५६०११.२४५०६४०००००सर्वोदय९८३८०११.६३२४५९५००००मोहनराव शिंदे८८९३०१०.९६२१३४३२०००केन अ‍ॅग्रो९२०५०१०.२६२११७१५०००उदगिरी शुगर१०३४१०११.२२२५८५२५०००सदगुरु श्री श्री शुगर११६३०५१०.०९२६७५०१५००एकूण१७८८७८७१०.७८४३९७५७४०४०