शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:59 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ तळीराम सापडले आहेत. या तळीरामांविरुद्ध जिल्हा न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सर्व तळीरामांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसातील ही कारवाई आहे.लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्चला आचारसंहिता लागली. तेव्हापासून जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये दररोज दहा ते बारा तळीराम सापडत आहेत. सांगली आणि मिरज वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईत आघाडीवर आहेत. तळीरामांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. वाहने जप्त केली जातात. दुसऱ्यादिवशी न्यायालयात खटले दाखल करून त्यांना हजर केले जाते. गुन्हा कबूल केल्यास दोन हजार रुपये दंड ठोठावला जातो. दंड भरल्याची पावती घेऊन ती पोलिसांना दाखविल्यानंतर जप्त केलेले वाहन सोडले जाते.दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्यानंतर अटकेची कारवाई, वाहन चालविण्याचा परवाना निलंबित, रद्द, हे उपाय तळीराम चालकांना अद्याप लागू पडलेले नाहीत. नशेत वाहन चालविल्याने अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करूनही फरक पडला नाही. अनेकदा पोलिसांना पाहून काही तळीराम अन्य मार्गाने पळून जाण्यात यशस्वी होतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलीस २४ तास रस्त्यावर आहेत. संशयित वाहने तपासली जात आहेत. त्यावेळी नशेत वाहन चालविणारे तळीराम सापडत आहेत. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसात ४२५ तळीराम सापडले आहेत.