शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

सांगली जिल्हा बँकेचे ४१ संचालक अपात्र

By admin | Updated: April 5, 2015 00:05 IST

चौकशी शुल्काचा झटका : बॅँकेच्या राजकारणापासून बाजूला राहावे लागणार

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी वीस हजार रुपयांच्या लेखा परीक्षण शुल्क वसुलीची जबाबदारी बॅँकेच्या ४१ माजी संचालकांवर शनिवारी निश्चित करण्यात आली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील ७३ (क व अ) या कलमानुसार हे ४१ संचालक निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले आहेत. सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी ही कारवाई केली. हे सर्व संचालक १९९७ ते २०१२ या तीन टर्ममधील असून, या दिग्गज नेत्यांना बँकेच्या कारभारापासून दूर राहावे लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८३ नुसार झालेल्या चौकशीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चौकशीचे २० हजार रुपये शुल्क तत्कालीन संचालकांकडून वसूल केले जाणार आहे. याबाबत तत्कालीन संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावर गेल्या सोमवारी सुनावणी झाली होती. शनिवारी संबंधित संचालकांकडून लेखा परीक्षण शुल्काचे प्रत्येकी ४२६ रुपये वसुलीचे आदेश सहनिबंधक दराडे यांनी दिले. २00१-२00२ ते २0११-१२ या कालावधीतील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगार खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. या सर्व व्यवहारात व्यवस्थापनातील ज्यांचा सहभाग आहे, तसेच ज्या अधिकारी, संचालकाने व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग दाखविला, अशांनी अधिकाराचा गैरवापर करून निधीचा दुरुपयोग केल्याचे अहवालात म्हटले होते. या प्रकरणातील माजी संचालक व अधिकाऱ्यांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चौकशी समितीचे शुल्क म्हणून २० हजार रुपये संचालक व अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली होती. त्यानुसार दराडे यांनी बँकेचे ५४ संचालक व मृत संचालकांचे १०२ वारस यांना नोटिसा बजावल्या होत्या. शुल्क वसुलीबाबतची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ४१ माजी संचालकांवर शुल्काची जबाबदारी शनिवारी निश्चित करण्यात आली. जबाबदारी निश्चितीमुळे त्यांचा गैरव्यवहारात सहभाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे सर्व संचालक कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवू शकणार नाहीत. जिल्हा बॅँकेच्या राजकारणापासून त्यांना दूर व्हावे लागणार आहे. महिन्यावर येऊन ठेपलेल्या बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)