शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जबाबदारी घेण्यास कर्मचाऱ्याला ४० लाखांची ‘आॅफर’ !

By admin | Updated: December 16, 2015 00:13 IST

--पेपरफुटी प्रकरण

सांगली : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेविका भरतीमधील पेपरफुटी प्रकरणात अनेक कर्मचाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचाही सहभागी असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणातून बड्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयातील एका कर्मचाऱ्यास चाळीस लाखांचे आमिष दाखवून त्याच्यावर जबाबदारी टाकण्यासाठी दोषींनी फल्डिंग लावली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.पंधरवड्यापूर्वी पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी दोन आरोग्य सेविका महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक संशयितांची नावे निष्पन्न होत गेली. हे संशयित जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत डझनभर अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली आहे. जे दोषी आहेत, त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावेही गोळा करण्यात आले आहे. परीक्षेला बसलेले जे उमेदवार पेपरफुटी ‘रॅकेट’च्या संपर्कात आले होते, त्यांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्याकडे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे प्रकरण अंगाशी येणार असल्याने अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मुद्रणालयातील एका कर्मचाऱ्यावर याची जबाबदारी टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कर्मचाऱ्याशी आर्थिक तडजोडीतून चर्चा चालू आहे. मुद्रणालयातील कर्मचाऱ्याने पेपर फोडल्याची जबाबदारी घ्यायची आणि त्या मोबदल्यात त्यास चाळीस लाखांपर्यंतची रक्कम देण्याच्या हालचाली चालू असून यास तो कर्मचारीही तयार झाल्याची चर्चा आहे. परंतु, मुद्रणालयाशी संबंधित काही वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ही चर्चा पोहोचल्याने त्यांनी काही कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. पैशासाठी जिल्हा परिषद मुद्रणालयाची बदनामी करू नका, असेही त्यांना खडसावल्याची चर्चा आहे. या गंभीर प्रकरणात राज्य शासनाने आणि आमदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे. कर्मचाऱ्याचा बळी देऊन पेपरफुटीचे रॅकेट दडपले जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)