इस्लामपूर : बोरगाव (ता.वाळवा) येथील एका ऊस तोडणी वाहतूक दलालाची परभणी जिल्ह्यातील मुकादमाने चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. ही घटना जूने, १८ ते जून, १९ या वर्षभरात घडली आहे.
याबाबत संभाजी रामचंद्र कामेरीकर (वय ४९, रा.बोरगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष दशरथ जाधव (रा.ताडलिंबला, जि. परभणी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सन २०१८-१९च्या हंगामात संतोष जाधव याने संभाजी कामेरीकर यांच्याशी ऊस तोडणीकरिता मजूर पुरविण्याचा करार केला होता. यामध्ये त्याने कामेरीकर यांची ४ लाख रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. पैशाची मागणी केली असता, जाधव हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने, कामेरीकर यांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.