शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

विट्यातील ३१ गाळेधारक दुहेरी संकटात

By admin | Updated: April 3, 2015 00:35 IST

पालिका व्यापारी संकुल : अनामत रकमेसाठी कर्ज, तर कर्जाच्या हप्त्यासाठी बँकांचा ससेमिरा

दिलीप मोहिते-विटा--विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई येथे नव्याने बांधलेल्या शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या अनामत रकमेसाठी कर्जबाजारी झालेले ३१ गाळेधारक व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत त्यांचा नाहक बळी गेला आहे. मार्चअखेरमुळे अनामतीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बॅँकांनी ससेमिरा लावला आहे. त्यामुळे गाळे तर ताब्यात मिळाले नाहीत, पण एक रुपयाचाही व्यवसाय न होता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.येथील शिवाजी चौकात ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या जुन्या खोकीधारकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करून दुकाने काढून घेतली. त्या जागी पालिकेने टोलेजंग व्यापारी संकुल उभारले. या संकुलातील गाळे प्राधान्याने जुन्या खोकीधारकांना देण्याचे पालिकेने आश्वासन दिले. त्यानुसार इमारत पूर्ण झाल्यानंतर पालिका सभेत २१ फेबु्रवारी २०१४ च्या ठराव क्र. १७७ नुसार अनामत रक्कम भरून घेऊन गाळे वाटप प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. २६ जूनला पालिकेने जुन्या ३१ खोकीधारकांकडून अनामत रक्कम भरून घेऊन गाळ्यांचा ताबा दिला. परंतु, गाळे वाटप प्रक्रिया सदोष झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेने वाटप प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी केली. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. त्यानंतर पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुध्द पुणे आयुक्तांकडे अपील केले. परंतु, ते अपीलही आयुक्तांनी फेटाळून लावले. त्यानंतर पालिकेने व्यापाऱ्यांना दिलेले गाळे सहा-सात महिन्यांपासून सील केले आहेत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला असून, त्यांना ताबाही सोडावा लागला आहे.दरम्यान, पालिकेने ठरवून दिलेली अनामत रक्कम गाळेधारक व्यापाऱ्यांनी लाखोंचे कर्ज घेऊन पूर्णपणे भरली. व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून कर्जाचे हप्ते फेडण्याची तयारी व्यापाऱ्यांनी केली होती. परंतु, सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीचा त्यांना फटका बसला आहे. मार्च एण्डमुळे कर्जाच्या हप्त्यासाठी बॅँका व्यापाऱ्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागल्या आहेत. त्यामुळे गाळेधारकांच्या ताब्यात गाळे नाहीतच, शिवाय अनामत रकमेच्या कर्जाचा बोजा डोक्यावर पडल्याने गाळेधारक व्यापारी दुहेरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन, सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी या व्यापाऱ्यांना गाळ्यांचा ताबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.