शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

३१ जुलैनंतर आमच्या वाटा वेगळ्या...

By admin | Updated: July 15, 2014 23:59 IST

अण्णा डांगेंचा इशारा : धनगर समाजाचा सांगलीत मोर्चा; अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी

सांगली : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी आज (मंगळवार) धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रदेशाध्यक्ष हणमंत पवार यांनी केले. ३१ जुलैपर्यंत राज्य शासनाने आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी अन्यथा आमच्या वाटा वेगळ्या आहेत, असा इशारा यावेळी डांगे यांनी दिला.धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाला करावी, घटनेमध्ये उल्लेख करण्यात आलेला धनगड व धनगर या दोन जाती एकच आहेत, हे स्पष्ट करावे आदी मागण्यांसाठी जिल्हा धनगर समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी डांगे म्हणाले की, हा मोर्चा आमचा असंतोष व्यक्त करण्यासाठी काढण्यात आला आहे. या मोर्चाद्वारे आम्ही इशारा देतो की, राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. याबाबत भूमिका स्पष्ट करावी अन्यथा १ आॅगस्टपासून आमच्या वाटा वेगळ्या असतील. १९५६ पासून धनगर समाज मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. या समाजाला बाजूला ठेवून इतर समाजांना शासनाने आरक्षण दिले आहे. यामुळे हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन काम करीत नसल्याचे स्पष्ट होते. धनगर समाजाला त्यांच्या अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे. निर्णय होईपर्यंत आम्ही या मागणीसाठी पाठपुरावा करीत राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी हणमंत पवार, शामराव जाधव आदींनी मार्गदर्शन केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.मोर्चाची सुरुवात राम मंदिर चौकापासून करण्यात आली. मोर्चामध्ये आकाराम मसाळ, सुनील मलगुंडे, किसन गावडे, संभाजी कचरे, वैशाली डांगे, अलका पुजारी, सुवर्णा यमगर, अमर पडळकर, सुनीता पांढरे, सुरेखा कोळेकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)