शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मोजण्याची यंत्रणा नसताना घनफुटाला ३० हजार पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

नरवाड : म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडून पाणीवाटपाची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. ओढ्या, नाल्याने पाणी सोडले जाते. यातील काही पाणी कर्नाटकातही ...

नरवाड : म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडून पाणीवाटपाची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. ओढ्या, नाल्याने पाणी सोडले जाते. यातील काही पाणी कर्नाटकातही जात आहे. या पाण्याची आम्ही पाणीपट्टी का भरायची, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पाण्याच्या मोजमापाची कोणतीही यंत्रणा नसताना घनफुटाला ३० हजार पाणीपट्टीची शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांनी एकरी पाणीपट्टी आकारण्याची मागणी होत आहे.

मिरज पूर्व भागातील म्हैसाळ प्रकल्पातून पाणी घेण्याच्या पाटबंधारेच्या जाचक अटींमुळे पाणी मागणीला खो बसत आहे. ‌‌२०२० ते २१ या सिंचन वर्षातील उन्हाळी हंगामातील पाणी आवर्तनाचे कृष्णा खोरे महामंडळाकडून नियोजन सुरू आहे. याविषयी म्हैसाळ पंपगृह उपविभाग क्र. दोनकडून संबंधित मिरज पूर्व भागातील गावांना लेखी कळविले आहे. या नोटिसीत म्हैसाळ प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम पाणी मागणी अर्ज नमुना ७ भरून मागणी करावी लागणार आहे. सिंचनाची उन्हाळी हंगामाची पाणीपट्टी प्रति

दशलक्ष घनफूट ३० हजार रुपये इतकी आहे.

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी पाटबंधारेचे काम अद्याप अपूर्ण असताना पाण्याची मोजणी दशलक्ष घनफुटात करणे हे अन्यायकारक असल्याच्या शेतकऱ्यांतून प्रतिक्रिया आहेत.

ज्याठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी पाणी ओढे-नाल्यातून न्यावे लागते त्याठिकाणी पाणी कसे मोजणार?

कारण बांधापर्यंत पाणी येताना जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे मोजमाप कोण करणार?

त्याचेही खापर पाटबंधारेने शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारल्याने शेतकरी पाणी मागणी अर्ज भरण्यास सरसावत नसल्याचे चित्र आहे. पाटबंधारेने पाणी मागणी अर्ज‌‌‌ एकरावर भरून घेतले पाहिजेत, तरच शेतकरी अर्ज घेण्यासाठी पुढे येणार आहेत.

पाण्याच्या पातळ्यांनी तळ गाठला असताना पाटबंधारेने टाकलेल्या जाचक अटींची गुगली मागे घेऊन शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. ‌याबाबत प्रगतिशील शेतकरी विश्वभूषण पाटील यांना विचारले असता, पाटबंधारेने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविल्यास प्रति दशलक्ष घनफुटात पाणीपट्टी आकारण्यास काहीच गैर नाही. मात्र, अशी कुठलीही सोय पाटबंधारेने केली नसल्याने पाण्याची एकरावरच मोजदाद करण्याचे मत व्यक्त केले.