शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मिरज महापालिका कार्यालयावर दगडफेकप्रकरणी २८ जणांची निर्दोष मुक्तता - अकरा वर्षांनंतर निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:28 IST

मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या

ठळक मुद्देआजी - माजी नगरसेवकांना निकालाने दिलासा

मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे यांच्यासह २८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालाने या सर्वांना महापालिकेची निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेतील गैरकारभार, मिरज शहरातील रस्ते व पिण्याच्या पाणीप्रश्नावर २००७ मध्ये शहरातील नगरसेवक, रिक्षाचालक, शेतकरी संघटना व नागरिकांचा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चावेळी दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यात मिरजेतील प्रथमवर्ग न्यायालयाने २०११ मध्ये आजी, माजी नगरसेवकांसह २८ जणांना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालामुळे दोषी ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांना निवडणूक लढविण्यात अडचणी आल्याने त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली होती.

या निकालाविरोधात सांगलीच्या जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. २८ जणांच्यावतीने तीन अपील दाखल होते. या तीन याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत नरवाडकर, गिरीश तपकिरे, सी. डी. माने यांनी काम पाहिले. शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेले अपील बुधवारी जिल्हा न्यायालयाने मंजूर करून माजी महापौर मैनुद्दीन बागवान, इद्रिस नायकवडी, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, आनंदा देवमाने व संभाजी मेंढे यांच्यासह २८ जणांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायालयाच्या या निकालाने सर्वांना दिलासा मिळाला आहे. या खटल्यातील दादासाहेब लांडगे, जयगोंड परगोंड, इब्राहिम चौधरी या तीन माजी नगरसेवकांचे निधन झाले आहेत. या खटल्याचा निकाल अकरा वर्षांनी लागला.न्यायालयाच्या निकालावर समाधानी - इद्रिस नायकवडीमहापालिका मिरज विभागीय कार्यालयावर नागरिकांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाबाहेरील काहींनी महापालिकेच्या मिरज कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीत बाराशे रुपयांचे किरकोळ नुकसान झाले होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकून २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी मिरज न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावला होता. याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने हे अपील मान्य केल्याने सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालावर समाधानी असल्याचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सांगितले.