शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामासाठी २७ हजार गृहभेटी देणार

By admin | Updated: December 13, 2014 00:17 IST

सतीश लोखंडे : जिल्हा परिषदेचा उपक्रम; अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार

सांगली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्याचे चालूवर्षीचे वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट १०५ गावांकरिता ३१ हजार ४७२ इतके आहे. या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी व त्याचा वापर करण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून गृहभेट विशेष मोहीम राबविण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी येथे दिली.जिल्ह्यातील १०५ गावांतील २७ हजार ७१४ इतक्या शौचालय नसलेल्या कुटुंबांना १ हजार ९१६ शासकीय अधिकारी व कर्मचारी भेट देऊन, शौचालय बांधकाम करण्यासाठी कुटुंबांच्या मानसिकतेत बदल करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुकास्तरीय विभाग प्रमुख, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, कक्ष अधिकारी, कंत्राटी कर्मचारी व आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी सहभाग घेऊन गृहभेट देणार आहेत.या अभियानाच्या अंमलबावणीसाठी तालुकानिहाय गृहभेट देण्यात येणाऱ्या गावांची संख्या, नियुक्त कर्मचारी व गृहभेट कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी - १३ गावे, १४० कर्मचारी व २ हजार ५०० कुटुंबे. जत - १७ गावे, २७२ कर्मचारी व ४ हजार २२८ कुटुंबे. कडेगाव - १६ गावे, ८४ कर्मचारी व २ हजार २६६ कुटुंबे. कवठेमहांकाळ - ५ गावे, १७० कर्मचारी व १ हजार २०० कुटुंबे. खानापूर - ११ गावे, ७१ कर्मचारी व १ हजार ३६४ कुटुंबे. मिरज - १० गावे, ३६९ कर्मचारी व ५ हजार २६० कुटुंबे. पलूस - ७ गावे, १८० कर्मचारी व २ हजार ९३ कुटुंबे. शिराळा - ६ गावे, ६० कर्मचारी व १ हजार १६५ कुटुंबे. तासगाव - १० गावे, १६८ कर्मचारी व ३ हजार १६० कुटुंबे. वाळवा - १० गावे, ४०२ कर्मचारी व ४ हजार ४७८ कुटुंबे.या अभिनव उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली असून या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंमलबजावणी करणार आहेत. या मोहिमेची सुरुवात आता जिल्ह्यात करण्यात आली असून महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)अडसूळ यांची नियुक्तीया अभिनव उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.