शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘महारेरा’कडून जिल्ह्यातील २७ गृहनिर्माण प्रकल्प काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST

सांगली : मुदतीत प्रकल्प पूर्ण न केलेले जिल्ह्यातील एकूण २७ गृहनिर्माण प्रकल्पांना महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (महारेरा)कडून काळ्या ...

सांगली : मुदतीत प्रकल्प पूर्ण न केलेले जिल्ह्यातील एकूण २७ गृहनिर्माण प्रकल्पांना महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (महारेरा)कडून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या प्रकल्पातील सदनिकांची विक्री, जाहिरात व वितरणासाठी ग्राहकांना आमंत्रित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महारेराने राज्यातील असे ६४४ प्रकल्प काळ्या यादीत टाकले आहेत. त्यातील ४ टक्के प्रकल्प सांगली जिल्ह्यातील आहेत. २०१७ ते २०१९ या कालावधीतील प्रकल्पांचा यात समावेश आहे. दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक असताना हे प्रकल्प संबंधित विकासकाने मुदतीत पूर्ण न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. महारेराने आता या प्रकल्पातील सदनिकांच्या विक्री, जाहिरात किंवा कोणत्याही व्यवहारास मनाई केली आहे. यातील बहुतांश प्रकल्प मोठे आहेत.

काही कारणास्तव घरखरेदीचा करार रद्द करणाऱ्या किंवा स्वत: ग्राहकाला करार रद्द करण्यास सांगणाऱ्या, मात्र दिलेल्या मुदतीत ग्राहकाला त्याने गुंतवलेले पैसे परत न देणाऱ्या बिल्डरांना दणका देणारा निर्णय महारेराने यापूर्वीही घेतला आहे. हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण होऊ शकत नसल्याने तुम्ही करार रद्द करून पैसे घ्या, अन्यथा अन्य प्रकल्पात गुंतवणूक करा, असे बिल्डरने गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सांगितल्याचे प्रकार बऱ्याचदा घडतात. अशा प्रकरणात दिलेल्या मुदतीत बिल्डरने पैसे न दिल्याने या ग्राहकांकडून महारेराकडे तक्रार केली जाते.

याशिवाय दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दलही तक्रारी केल्या जात आहेत. बिल्डरने नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्या्नंतर महारेराकडून अशा प्रकरणात कारवाई करण्यात येते. नव्या आदेशानुसार मुदतीत प्रकल्प पूर्ण न केलेले जिल्ह्यातील २७ प्रकल्प काळ्या यादीत टाकले असून, संबंधित प्रकल्पातील सदनिका विकता येणार नाही, असेही महारेराने आदेशात म्हटले आहे. यापूर्वी अशा प्रकरणात ग्राहकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागत होते.

चाैकट

काळ्या यादीत टाकलेले प्रकल्प

२०१७ १

२०१८ ९

२०१९ १७

एकूण २७