शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कार्वे येथे डाकपालाकडून २६ हजार रुपयांचा अपहार

By admin | Updated: June 25, 2015 22:50 IST

पोस्ट खात्यातील अपहार झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराचा संशय कांबळे याच्यावर आल्याने डाक निरीक्षक श्रीकांत माने व वायदंडे यांनी कार्वे पोस्टातील खातेदारांच्या दफ्तरांची तपासणी केली.

विटा : पोस्टातील बचत खातेदाराच्या पुस्तकावर रक्कम जमा केल्याची खोटी नोंद करून पोस्टातील व महिला बचत खातेदाराच्या २६ हजार ३२५ रुपयेंचा अपहार केल्याप्रकरणी कार्वे (ता. खानापूर) येथील पोस्टातील डाकपाल विनोद विठ्ठल कांबळे (रा. कार्वे, ता. खानापूर) याच्याविरुध्द गुरुवारी विटा पोलिसात गुन्हा दाखल केला. विटा विभागाचे डाक निरीक्षक श्रीकांत माने यांनी फिर्याद दिली.विटा पोस्ट कार्यालयांतर्गत कार्वे येथील डाकघर आहे. तेथे १९९७ पासून विनोद कांबळे डाकपाल म्हणून काम करीत आहे. दि. १८ आॅक्टोबर २०१३ ते दि. १६ जुलै २०१४ या कालावधीतील कार्वे डाकघरातील दफ्तराची तपासणी एस. एस. वायदंडे यांनी केली. पोस्टाच्या खात्यातील ८ हजार ३२५ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराचा संशय कांबळे याच्यावर आल्याने डाक निरीक्षक श्रीकांत माने व वायदंडे यांनी कार्वे पोस्टातील खातेदारांच्या दफ्तरांची तपासणी केली.बचत खातेदार सुलाबाई तानाजी जाधव यांच्या खाते पुस्तकावर १८ हजार रुपयांची खोटी नोंद केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ही रक्कम कांबळे याने पोस्ट खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे कार्वे पोस्टातील डाकपाल कांबळे याने पोस्टाच्या ८ हजार ३२५ व महिला बचत खातेदार सौ. सुलाबाई जाधव यांची १८ हजार असा एकूण २६ हजार ३२५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कांबळे याच्याविरुध्द गुरुवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आर. बी. वाघमोडे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)