शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र

By admin | Updated: July 4, 2017 23:32 IST

कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफीच्या निर्णयाअंतर्गत टाकलेल्या नव्या नियमांच्या गुगलीने जिल्ह्यातील २६ हजार ७२७ शेतकऱ्यांना बाद ठरविले आहे. प्राथमिक टप्प्यात आता केवळ १५ हजार ६०६ शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असून, अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेक शेतकरी अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत. शासनाने, २०१२ पूर्वी कर्ज घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जदारांना कर्जमाफी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नियमाच्या आधारे आता २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात याचा उल्लेख करून शासनाच्या नियमांची खिल्ली उडविली होती. वास्तविक जिल्हा बँकेनेही याबाबतचा अहवाल शासनाला दिला आहे. दीड लाखाची कर्जमाफी मिळणाऱ्यांची जिल्ह्यातील एकूण यादी ४२ हजार ३३३ शेतकऱ्यांची होती. यातील किमान ९० टक्के शेतकरी तरी नियमात बसतील, असे वाटत असतानाच, २०१२ च्या नियमाने ही यादी १५ हजाराच्या घरात आणली आहे. पंचवीस हजारापर्यंतच्या अनुदानास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी १ लाख ६८ हजार ४८२ इतकी आहे. त्याची रक्कम ४२१ कोटी २० लाख ५० हजार इतकी होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफीने फारसे काही पडणार नाही, असे चित्र आहे. २०१२ च्या नियमातून सुटलेले आणि कर्जमाफीस पात्र असलेले १५ हजार ६०६ शेतकरीही पूर्णत: कर्जमाफीस पात्र ठरले नाहीत. अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेकजण अपात्रही ठरू शकतात. त्यामुळे ही संख्या आणखी कमी होऊ शकते. २०१२ पूर्वीच्या कर्जदारांना वगळण्याचा हा निर्णय शासनाने तातडीने रद्द करण्याची मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.सात-बारा कोरा होणार कसा?सात-बारा कोरा होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या केवळ २३ हजाराच्या घरात आहे. याशिवाय दीड लाखावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच माफी मिळणार आहे. दुष्काळी भागातील अनेक शेतकरी दीड लाखावरील यादीत असल्यामुळे, त्यांना ही रक्कम भरणे अडचणीचे ठरणार आहे. एकूण ३०९५ शेतकऱ्यांचे ९६ कोटी ७२ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे.