जिल्ह्यातील मृत्यूसंख्येत घट होत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी महापालिका क्षेत्रात कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील सहाजणांचा मृत्यू झाला असून, त्यात खानापूर तालुक्यातील दोन, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या २५२७ पैकी ५६२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४६५ जण ऑक्सिजनवर, तर ९७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाने रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३८९३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १५६ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲंटिजनच्या ४१५८ जणांच्या नमुने तपासणीतून १०७ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवीन सहाजण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट -
आतापर्यंतचे एकूण बाधित १९३९२६
उपचार घेत असलेले २५२७
कोरोनामुक्त झालेले १८६२९९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५१००
रविवारी दिवसभरात
सांगली २८
मिरज १३
आटपाडी ४७
कडेगाव १७
खानापूर २९
पलूस १४
तासगाव २७
जत ३०
कवठेमहांकाळ १०
मिरज तालुका २०
शिराळा ६
वाळवा १६