शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सांगलीत २१ लाख लिटरने पाणी उपसा वाढला

By admin | Updated: March 16, 2017 23:37 IST

महापालिका : सुरळीत पुरवठ्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

सांगली : सांगली शहराच्या उपनगरांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत. गुुरुवारी कृष्णा नदीवरील साडेसातशे एच.पी.चा पंप सुरू करण्यात आला. त्यामुळे शहरात दिवसभरात २१ लाख लिटर पाणी उपसा वाढला आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा अभियंता शरद सागरे यांनी सांगितले.महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या आठ दिवसांपासून पत्रकारनगर, शामरावनगर, हनुमाननगर, त्रिमूर्ती कॉलनी, शंभरफुटी रोडवरील अनेक उपनगरांत पाण्याचा ठणठणाट होता. काही भागात तर दूषित आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळली होती. पाणीटंचाईचे पडसाद स्थायी समिती सभेतही उमटले. नगरसेविका अलका पवार, राजू गवळी, प्रदीप पाटील यांनी स्थायी समितीत आंदोलन केले. महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दखल घेऊन नियोजनासाठी बैठकही घेतली. खेबूडकर यांनी पाणीपुरवठ्याचे नियंत्रण करणाऱ्या व्हॉल्व्हचा शोध घेऊन ते दुरूस्तीचे आदेश दिले होते. तसेच कृष्णा नदीवर साडेसातशे एच.पी.चा पंप सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी पंप सुरू केला. त्यामुळे सांगलीत २१ लाख लिटर जादा पाणी उपसा वाढला आहे. व्हॉल्व्हची शोधमोहीम सुरू असून येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू होईल, असे कार्यकारी अभियंता सागरे यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकारनगरात पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी खुदाई करून पाईपलाईनची स्वच्छता करण्यात आली. शिवाय पाईपलाईन कुठे तुंबली आहे का, याचीही तपासणी केली. (प्रतिनिधी)