शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, गटारीच्या निविदेत अडीच कोटीचा घोटाळा

By admin | Updated: May 10, 2017 23:37 IST

रस्ते, गटारीच्या निविदेत अडीच कोटीचा घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रस्ते व गटारीच्या निविदेत दोन कोटी ४४ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. या निविदेत अनेक बनावट कामे घुसडण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्याचा नगरसेवक व अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जिल्हा सुधार समितीने केला आहे. ही निविदा रद्द करावी व दोषींवर कारवाईसाठी १५ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुधार समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे, अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रा. आर. बी. शिंदे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत रस्ते व गटार घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ते म्हणाले, महापालिका आयुक्तांच्या सहीने ९ मे रोजी तीनही शहरातील रस्ते व गटारीच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेत पूर्वी झालेल्या कामांचाही समावेश झाला आहे. आमदार निधीतून झालेली कामेही निविदेत आहेत. एकाच रस्त्याची नावे बदलून दोन कामे पकडली आहेत. गटारीची कामे तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहेत. त्यामुळे महापालिकेचा पैसा वाया जाणार आहे. निविदेत रस्ता सुधारणा असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थच समजत नाही. महापालिका हद्दीत दहा दत्तनगर असतील. नेमक्या कुठल्या दत्तनगरमध्ये काम मंजूर आहे, हे निविदेवरून स्पष्ट होत नाही. कुपवाड शहरात तीन जैन मंदिर आहेत. त्यापैकी कोणत्या जैन मंदिरासमोर रस्त्याचे काम होणार आहे? मिरजेतील बहुतांश कामे बनावट आहेत. ख्रिश्चन दफनभूमीला वॉल कंपाऊंड व पेव्हिंग बसविण्यासाठी निविदा काढली आहे. वास्तविक दफनभूमीचे कंपाऊंड सुस्थितीत आहे. गटारीची कामे तर चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत. रामामातानगर येथे गटारीचे काम सुरू असतानाही निविदा काढली आहे. राजमाने हौसिंग सोसायटीतील रस्ते आमदार फंडातून झाली आहेत. तिथे तसा फलकही आहे. तरीही तेथील कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. मंगलमूर्ती कॉलनीतील रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. अभिनंदन कॉलनीतील रस्ते सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले आहेत. शिवमंदिर इसापुरे गल्लीत पेव्हिंग ब्लॉक असताना पुन्हा रस्ता दुरुस्तीकरणावर पैसे खर्च केले जात आहेत. या निविदेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जवळपास २ कोटी ४४ लाख रुपयांचा घोटाळा करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करावी, अशअ’ी मागणीही त्यांनी केली.