शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगचा २४ टन तांदूळ साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात रेशनिंग तांदळाचा मोठा घोटाळा उघडकीस आणण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात रेशनिंग तांदळाचा मोठा घोटाळा उघडकीस आणण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सोमवारी चाबुकस्वारवाडी येथे पोलिसांनी छापा टाकून आणखी २४ टन तांदळाचा साठा जप्त केला. याप्रकरणी रमेश बाबू गुंडेवाडी (वय ४७, रा. सलगरे) याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ८४ टन बेकायदा तांदळाचा साठा जप्त केला आहे.

सांगली ग्रामीण पोलिसांनी २ डिसेंबर रोजी लक्ष्मीफाटा येथे तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. या ट्रकमधून २० टन रेशनिंगचा तांदूळ जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी बिऊर (ता. शिराळा) येथील संदीप वीरभद्र कानकत्रे व प्रवीण वीरभद्र कानकत्रे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बिऊर येथील सिद्धनाथ राईस मिलच्या गोदामातून आणखी ४० टन तांदूळ साठा ताब्यात घेण्यात आला.

पोलिसांनी तांदूळ घोटाळ्याचा सखोल तपास हाती घेतला असता, सलगरे येथील रमेश गुंडेवाडी हा मोठ्या प्रमाणात तांदूळ विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने त्याच्या मूळ गावी चाबुकस्वारवाडी येथे तपास केला असता, २४ टन तांदूळ सापडला. त्याची किंमत ७ लाख २० हजार इतकी आहे.

याप्रकरणी गुंडेवाडी याला अटक करण्यात आली आहे. त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सागर पाटील, हवालदार संदीप मोरे, सचिन मोरे, शंतनू ढवळीकर करीत आहेत.

चौकट

आतापर्यंत ८४ टन तांदूळ जप्त

पोलिसांनी आतापर्यंत रेशनिंगचा ८४ टन तांदूळ साठा जप्त केला आहे. त्याची किंमत ३१ लाख २० हजार इतकी आहे. आणखी कोठून तांदूळ आला, किती जणांचा यात सहभाग आहे, आणखी कोठे बेकायदा साठा आहे का, याचा तपास संशयितांकडे सुरू असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी सांगितले.