मिरजेतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह ५३ जणांवर गणेशोत्सवादरम्यान महापालिका क्षेत्रातून हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. याबाबत २४ जणांच्या प्रस्तावावर सुनावणी होऊन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सर्वांना दि. १५ ते १९ पर्यंत महापालिका क्षेत्रातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
हद्दपारीची कारवाई झालेल्यांमध्ये आनंद सातपुते, अमर सूर्यवंशी, उत्तम बन्ने, प्रमोद हुलवान, बाळू सिसाळ, मंगेश ऊर्फ मुरिशद हुलवान, पवन ऊर्फ धर्मराज बंडगर, महावीर रामा हुलवान, राहुल सातपुते, किरण सातपुते, अनिल सातपुते, प्रवीण सातपुते, अतुल सूर्यवंशी, राम भंडारे, सचिन भंडारे, संभाजी हुलवान, सुनील हुलवान, कृष्ण बंडगर, प्रमोद हुलवान, बाबासाहेब बंडगर, बाळू शिसाळ, मंगेश हुलवान, पवन बंडगर, महावीर हुलवान यांचा समावेश आहे.