शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा २३ लाखांचा अपहार

By admin | Updated: July 19, 2014 23:23 IST

तिघांचा समावेश : जत पंचायत समितीचा अहवाल

जत : तालुक्यातील बोर्गी खुर्द व बोर्गी बुद्रुक या दोन ग्रामपंचायतींमधील तीन ग्रामसेवकांनी २०११ ते ३१ मार्च २०१४ अखेरच्या कालावधित २३ लाख ३० हजार रुपयांचा अपहार केला आहे. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असा अहवाल जत पंचायत समितीने जिल्हा परिषदेला पाठविला आहे. त्यामुळे तालुक्यातील महसूल विभागात खळबळ माजली आहे.२०११-२०१४ या कार्यकाळात आर. के. धाबेकर ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी पर्यावरण संतुलित गाव, तेरावा वित्त आयोग व पाणीपुरवठा योजना आदी कामात गैरव्यवहार करून २२ लाख रुपयांचा अपहार केला आहे. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात अशोक बिरादार यांनी ७० हजार रुपये व ए. टी. खोत यांनी ६० हजार रुपयांचा अपहार केला आहे. वरील एकत्रित २३ लाख ३० हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार प्रशासनाने जत पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले होते. जत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाने वरील तीन ग्रामसेवकांनी केलेल्या विविध विकासकामांची चौकशी करून २३ लाख ३० हजार रुपये अपहाराची रक्कम निश्चित केली आहे.जिल्हा परिषद व जत पंचायत समितीने वरील तीन ग्रामसेवकांवर अपहाराचा ठपका ठेवून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषदेतील एक पदाधिकाऱ्याने ग्रामसेवकांची बाजू घेतली आहे. तिघे ग्रामसेवक निरपराध आहेत, असे वरिष्ठांना सांगून त्यांना ग्रामसेवकांचा २३ लाखांचा अपहारपाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांची येथून बदली करून या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी या ग्रामसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत, असेही समजते. (वार्ताहर)कारवाईचा निर्णयजिल्हा परिषद व जत पंचायत समितीने वरील तीन ग्रामसेवकांवर अपहाराचा ठपका ठेवून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.