सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे २२३ रुग्ण आढळून आले, तर ३२३ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात ३५ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ३२, मिरजेत ३ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ३५, जत २३, कडेगाव २३, कवठेमहांकाळ ५, खानापूर ५३, मिरज १२, पलूस ४, शिराळा ३, तासगाव १४, वाळवा १६, तर जिल्ह्याबाहेरील कोल्हापूर, सातारा, कर्नाटकातील ६ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील ५ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज तालुक्यातील २, जत १, तर महापालिका क्षेत्रात सांगली व मिरजेतील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सध्या ४७१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या ३५०० चाचण्यांत ११२ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ३७४८ चाचण्यांत ११७ रुग्ण आढळले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,९५,३१४
कोरोनामुक्त झालेले : १,८८,१३९
आतापर्यंतचे मृत्यू : ५१४५
उपचाराधीन रुग्ण : २०३०
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : ३२
मिरज : ३
आटपाडी : ३५
जत २३
कडेगाव २३
कवठेमहांकाळ ०५
खानापूर ५३
मिरज १२
पलूस ४
शिराळा ३
तासगाव १४
वाळवा १६