शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात २२ तलाव कोरडे

By admin | Updated: March 3, 2017 23:47 IST

एकाच तलावात ५0 टक्केपेक्षा जास्त पाणी : उत्तर भागात तीव्र टंचाईचे संकट; आंदोलनाचा इशारा

विकास शहा ल्ल शिराळाशिराळा तालुक्यातील ४९ पैकी २२ पाझर तलाव मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरडे पडले आहेत, तर फक्त एकाच तलावात ५0 टक्केपेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचीही भीषण टंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. तालुक्याच्या उत्तर भागात अनेक गावांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.शिराळा तालुक्याला पावसाचे आगर म्हणून संबोधले जाते. मात्र तालुक्यातील उत्तर भागात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात ४९ पाझर तलाव आहेत. त्यापैकी सावंतवाडी, शिरसटवाडी, हात्तेगाव (आंबाबाईवाडी), कोंडाईवाडी नंबर १, शिरशी नंबर १, शिरशी (भैरवदरा), शिरशी (काळेखिंड), शिरवाडी, भैरेवाडी, पणुंब्रे तर्फ शिराळा नंबर १, औंढी, निगडी जुना, निगडी (खोकडदरा), करमाळे नंबर २, भटवाडी, बेलदारवाडी, इंगु्रळ, लादेवाडी, भाटशिरगाव, तडवळे नंबर १, पावलेवाडी नं. १ हे तलाव कोरडे पडले आहेत. कोंडाईवाडी नंबर २ (१0 टक्के पाणी), कापरी (१0 टक्के), चरणवाडी नंबर १, चव्हाणवाडी, मेणी, प. त. शिराळा नं. २, वाकुर्डे बुद्रुक, पाडळी, पाडळीवाडी, बिऊर, तडवळे (वाडदरा) यामध्ये २0 टक्के, गवळेवाडी (बहिरखोटा), बादेवाडी (वाकुर्डे बुद्रुक), रेड क्र. २ (२५ टक्के), गवळेवाडी (उंदीरखोरा), धामवडे, शिरशी, (कासारकी), वाकुर्डे खुर्द, निगडी (महारदरा), पाचुंब्री या तलावांमध्ये ३0 टक्के, अंत्री खुर्द, करमाळा नं. १ यामध्ये ३५ टक्के, आटुगडे (मेणी), हात्तेगाव (अशील कुंड), खिरवडे याठिकाणी ४0 टक्के, तर वाडीभागाई येथे ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.शिंदेवाडी तलाव नोव्हेंबर महिन्यातच कोरडा पडला आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील मुख्य वाकुर्डे बुद्रुक, शिंदेवाडी, धामवडे, खेड, बेलदारवाडी यांसह वाड्या-वस्त्यांवर आतापासूनच ५ ते १0 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. पंचायत समिती, पाटबंधारे विभागाकडून २0 गावे व १७ वाड्यांसाठी दोन तात्पुरत्या नळपाणी योजनांतून, २0 विहिरी अधिग्रहण करणे, १२ गावे व १६ वाड्यांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.