शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पलूस-कडेगावसाठी २२ कोटी निधी

By admin | Updated: April 6, 2016 00:04 IST

पतंगराव कदम : चंद्रकांत पाटील, गडकरी यांच्याशी विकासकामांबाबत चर्चा

कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांसाठी केंद्रीय राखीव निधीतून साडेबावीस कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याबाबत केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.याबाबत माहिती देताना डॉ. कदम म्हणाले की, याशिवाय जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या रस्त्यांवर उड्डाण पुलांचीही कामे प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे लवकरच मार्गी लागतील. पुसेसावळी-कडेपूर वांगी-अंबक-कुंभारगाव-कुंडल राज्यमार्ग १५८ च्या सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठी १६ कोटी ५० लाख इतका निधी, तर वांगी - रामापूर-बांबवडे प्रजिमा १९ च्या सुधारणा करण्यासाठी ६ कोटींचा निधी गडकरी व चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याचे डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. याशिवाय सांगली जिल्ह्यातील ज्या रस्त्यांवर रेल्वेक्रॉसिंग आहेत त्याठिकाणी उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत मंत्री नितीन गडकरी यांच्याशी समक्ष चर्चा झाली असून, भिलवडी स्टेशन, रामानंदनगर (किर्लोस्करवाडी), विठ्ठलवाडी (आमणापूर) वसगडे, घोगाव, भवानीनगर आणि माधवनगर (जुना बायपास रस्ता) याठिकाणी उड्डाणपुलांची मागणी केलेली आहे. त्यासाठी निधी मंजूर होणार आहे. याशिवाय पलूस तालुक्यातील दह्यारी येथे यापूर्वीच उड्डाण पूल मंजूर करून घेतला आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल, असे यावेळी कदम यांनी सांगितले. ताकारी-टेंभू योजनेची वीजबिले शासनाने टंचाईतून भरावी, याबाबतही संबंधित मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. (वार्ताहर)मंत्र्यांशी सलोखा आणि विकासकामांना गतीमी विकासकामात कधीही राजकारण आणत नाही. राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्याकडे मुंबईत सातत्याने प्रस्तावित विकासकामांच्या निधीसाठी माझा पाठपुरावा असतो. जिथे काम असेल त्या मंत्र्यांच्या थेट दालनात जाऊन कामांची मंजुरी घेतो. यामुळे सत्ता असो किंवा नसो पलूस-कडेगाव मतदारसंघातील विकासकामांचा वेग मात्र कायम आहे, असे कदम यांनी सांगितले.